Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे जाहिर निषेध !**पत्रकारांना धमकी व अर्वाच्य भाषेचा वापर करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा*जाहीर निषेध !*

Responsive Ad Here
    ..गडब / अवंतिका म्हात्रे

       निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्रकारांशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वर्तनाचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात येत आहे.
    लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी अशा प्रकारे अवमानकारक व धमकीची भाषा वापरणे हे अत्यंत निषेधार्ह असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करणारे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.
निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही मागणी करतो की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित खासदारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या खासदारकीचा तात्काळ राजीनामा द्यावा.
यासंदर्भात मा, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन पत्रकारांच्या सन्मानाचे व सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात येत आहे.
   .निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य

जाहीर निषेध...! जाहीर निषेध...!! जाहीर निषेध...!!!