✍🏻 *गडब / अवंतिका म्हात्रे*
दिनांक 4 जुन ते 9 जुन 2026 दरम्यान चालु असलेल्या 29 व्या कॅप्टन एस.जे.एझिकल शूटिंग नेमबाजी चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत क्लब चे नेमबाज प्रितम पाटील, संदेश थळे , अब्दुल रहिम शेख, मिलिंद पांचाळ,यांनी 50मीटर रायफल प्रोन मध्ये व अस्मिता झा हीने 10 मीटर एअर पिस्तूल मध्यै ,ह्या सर्व नेमबाजांनी महाराष्ट्र रायफल संघटना वरळी मुंबई येथे नेत्रदीपक कामगिरी करत निर्णायक गुण मिळवून यश संपादन केले आहे,
महाराष्ट्र रायफल संघंटना मान्यताप्राप्त सिद्धांत रायफल व पिस्तूल शूटिंग क्लब रायगड चे हे सर्व नेमबाज आता महाराष्ट्र रायफल संघटना चे प्रतिनिधित्व पिस्तूल व रायफल ह्या खेळ प्रकारामध्ये ऑल ईंडिया( प्रि नॅशनल लेवल )रायफल व पिस्तूल शूटिंग मध्ये करणार आहेत,
ह्या नेमबाजांनी क्लब चे सेक्रेटरी ,प्रशिक्षक,रायगड भुषण,विख्यात राष्ट्रीय नेमबाज किशन खारके रायगड जिल्ह्यातील पहीला10 ,25 व 50 मीटर पिस्तूल Renowned shooter ,तसेच राष्ट्रीय नेमबाज,आय,एस.एस एफ कौच अलंकार कोळी यांच्याकडे नेमबजीचे प्रशिक्षण ईंडियन माॅडेल स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज उलवा,चिरनेर अशा वेगवेगल्या रेंजवर घेतले आहे.
काही महिन्याच्या सरावामध्ये ह्या नेमबाज ह्यानी हे यश संपादन केले आहे प्रशिक्षकांच्या उत्तम कामगिरीमुळे इतर जिल्ह्यातील मुले प्रशिक्षण घेण्यासाठी सिद्धात रायफल व पिस्तूल शूटिंग क्लब रायगड रेंजवर येत असे .आज पर्यंत रायगड जिल्हय़ातून आंतरराष्ट्रीय नेमबाज सिल्व्हर मेडलीस्ट डबल ट्रॅप शाॅटगन शूटर कु.अवनी कोळी ,कु.शरयू दळवी ही ह्याच क्लब ची नेमबाज, तसेच राष्ट्रीय पातळीवर बरेच नेमबाज क्लबचे नाव तसेच रायगड जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवत आहेत
ऑल ईंडिया स्पर्धेत क्लब च्या नेमबाज ह्यांची निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.
सिद्धांत रायफल व पिस्तूल शूटिंग क्लब रायगड चे अध्यक्ष विजय खारकर, सचिव किशन खारके,खजिनदार प्रितम पाटील, महेश फुलोरे.अजिंक्य चौधरी,समाधान घोपरकर, श्रीराम पाटील सर,राजु मुंबईकर रिशीकेश केणी ईतर सदस्य
तसेच ईंडियन माॅडेल स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज चे संचालक ईतर सभासद ह्यानी यांच्या निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत