Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️हमरापुर फाटा येथे झाडीझुडपात अर्धनग्न अवस्थेत 35 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला; पेण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल .♦️फॉरेन्सिक टीम व श्वानपथक कडून झाडाझुडुपांमध्ये व परिसरात अधिकचा तपास सुरू...

Responsive Ad Here

      ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
       पेण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत शितोळे आदिवासीवाडी, हमरापुर फाटा परिसरातील टेकडीवरील झाडीझुडपात एका 35 वर्षीय महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पेण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   पेण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेची ओळख आंबी जान्या जाधव (वय 35, रा. भोंगुली, महलमिऱ्या डोंगर, ता. पेण) अशी झाली आहे. ती काही दिवसांपासून नवरा व आई-वडिलांकडून स्वतःहून पेण येथे आली होती. दरम्यान सोमवार ८ जून 2026 रोजी तिचा मृतदेह मुंबई गोवा महामार्गालगतच्या झाडीझुडपात संशयास्पद अवस्थेत आढळून आला.
   फिर्यादी म्हणून महिलेच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून महिलेच्या तोंडावर कठीण वस्तूने वार करून तिचा खून केला व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह अर्धनग्न अवस्थेत झाडीझुडपात टाकून पळ काढला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पेण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. फॉरेन्सिक टीम व श्वानपथक कडून झाडाझुडुपांमध्ये व परिसरात अधिकचा तपास सुरू आहे. रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलिस निरीक्षक संदीप बागुल व पेण पोलिस पुढील तपास करत आहेत. यावेळी मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात ग्रस्तांचे मदतगार कल्पेश ठाकूर हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी उपस्थित होते.