Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️वडखळ-अलिबाग मार्गावरील भीषण अपघातात पेझारीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; अज्ञात वाहनचालक फरार!

Responsive Ad Here

      गडब/अवंतिका म्हात्रे

     
रायगड जिल्ह्यातील अलिबाग-वडखळ मार्गावर मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात पेझारी येथील २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत.
प्राप्त माहितीनुसार, वडखळ पेट्रोलपंपासमोरील इंडियन ऑईलजवळ ९ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.०६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. नयन पाटील हे त्यांच्या ताब्यातील ब्रिझा कार (एमएच ०६/सीएल/३४६३) घेऊन वडखळ-अलिबाग मार्गावरून प्रवास करत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचे मोठे नुकसान झाले आणि नयन पाटील गंभीर जखमी झाले.
अपघातात नयन यांच्या डाव्या पायाच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले तसेच शरीरावर गंभीर दुखापती झाल्या. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी वडखळ पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अपघातास कारणीभूत वाहनाचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीद्वारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. दरम्यान, नयन पाटील यांच्या निधनाने पेझारी परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदरील घटनेचा अधिक तापस वडखळ पोलिस ठाण्याचे पो.ह. रूपेश कोंडे हे करत आहेत.