Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️गडब गावचे जागृत देवस्थान नवसाला पावणारी आई काळंबा माता

Responsive Ad Here
✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर गडब गावातील निसर्ग सानिध्य लाभलेल्या उंच टेकडीवर नवसाला पावणाऱ्या श्री कालंबा देवी मातेचे जागृत देवस्थान आहे. या देवीच्या स्थानाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी कळंब नावाच्या राक्षासने संपूर्ण कोकणात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ऋषीमुनींनी होम यज्ञ करुन आदीशक्तीची आराधना केली. त्यानुसार देवीने प्रकट होउन कळंब राक्षसाचा वध केला व ती विसावा घेण्यासाठी तेथे थांबली. त्यानंतर त्या गावातील पाटील बंधूंना देवीच्या रुपातील एक स्वयंभु शिळा सापडली, त्या शिळेची त्यांनी पूजा अर्चा करून त्याच ठिकाणी तिची प्रतिष्ठापना  करून तेथे छोटे मंदिर उभारण्यात आले. ती ही काळंबा देवी माता,
सन १९४४ साली गडब येथे प्लेगची साथ आली. ग्रामस्थांनी देवीची मनोभावे सेवा केल्याने ग्रामस्थांना प्लेगच्या साथीपासून तारले, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. गडब हे दाट लोकवस्तीचे गाव असून, सरकारी कागदोपत्री काराव या नावाने ते ओळखले जाते. या आराध्य दैवतांवर गावांतील ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे. या परंपरेनुसार काळंबादेवीचे दर्शन घेउनच मग कुठल्याही कामास सुरुवात करण्यास ग्रामस्थांची प्रथा आहे .
     देवीचे दर्शन घेल्यानंतर आरंभलेल्या कामात यश मिळते अशी श्रद्धा ग्रामस्थांच्या मनात रुजलेली आहे. कालंबा देवीची जत्रा चैत्र महिन्यात हनुमान जयंतीच्या आदल्यादिवशी करण्याची परंपरा फार पुर्वीपासून आहे
या चैताच्या महिन्यात आईच्या जत्रेची परंपरा जपत् मुंबई येथे नोकरीसाठी असणारे तसेच इतरत्र कामानिमित्त बाहेर असणाऱ्या भक्तांची मोठी गर्दी या मंदिरात दर्शनासाठी पहायला मिळते. या जत्रेच्या महत्त्व म्हणजे मोठमोठ्या " देवकाठ्या " या देवकाठ्या घेऊन गडब ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सामिल होताना दिसतात .