Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️गांधर्व मंच या राष्ट्रीय स्तरावरील पखवाज क्लासिकल सोलो वादन स्पर्धेतअंशुल नंदन म्हात्रे याचे सुयश ; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव♦️

Responsive Ad Here
    ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

     २८ जून २०२६ रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ ( पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत) आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'गांधर्व मंच' या राष्ट्रीय स्तरावरील पखवाज क्लासिकल सोलो वादन, भारतीय शास्त्रीय संगीत आणि संतरचित अभंग गायन स्पर्धा पार पडल्या. २८ जून २०२६ रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ ( पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत) आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'गांधर्व मंच' या राष्ट्रीय स्तरावरील पखवाज क्लासिकल सोलो वादन, भारतीय शास्त्रीय संगीत आणि संतरचित अभंग गायन स्पर्धा पार पडल्या. पखवाज क्लासिकल सोलो वादन स्पर्धेत गुरूवर्य पंडित श्री मृणाल मोहन उपाध्याय यांचे शिष्य कुमार अंशुल नंदन म्हात्रे राहणार गडब, तालुका पेण, जिल्हा -रायगड. वय वर्षे १३ याने प्रथम क्रमांक पटकावत सुयश संपादन केले आहे. 
आपल्या बहारदार वादनाने परीक्षकांची आणि रसिकांची त्याने दाद मिळवली. उत्कृष्ट सादरीकरणासाठी भारत देशात "प्रथम क्रमांक" एकाच घराण्यात म्हणजे पंडित वासुदेव उपाध्याय पंरंपरा, गया यांना मिळाला आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल अंशुल नंदन म्हात्रे यांना विशेष प्रमाणपत्र आणि आकर्षक चषक रोख रक्कम माजी मुख्यमंत्री माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, मा. खाजदार श्रीरंग आप्पा बारणे श्री. अवधुतजी गुप्ते, श्री. सदानंद मोरे या दिग्गज मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. गुरूवर्य पंडित श्री मृणाल मोहन उपाध्याय यांचे शिष्य कुमार अंशुल नंदन म्हात्रे राहणार गडब, तालुका पेण, जिल्हा -रायगड. वय वर्षे १३ याने प्रथम क्रमांक पटकावत सुयश संपादन केले आहे. आपल्या बहारदार वादनाने परीक्षकांची आणि रसिकांची त्याने दाद मिळवली. उत्कृष्ट सादरीकरणासाठी भारत देशात "प्रथम क्रमांक" एकाच घराण्यात म्हणजे पंडित वासुदेव उपाध्याय पंरंपरा, गया यांना मिळाला आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल अंशुल नंदन म्हात्रे यांना विशेष प्रमाणपत्र आणि आकर्षक चषक रोख रक्कम माजी मुख्यमंत्री माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, मा. खाजदार श्रीरंग आप्पा बारणे श्री. अवधुतजी गुप्ते, श्री. सदानंद मोरे या दिग्गज मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.