Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️पेण तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा होत असल्याच्या अफवेमुळे गॅस एजन्सी समोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा !

Responsive Ad Here

✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

 पेण तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुडवडा होत असल्याच्या अफवेमुळे गॅस एजन्सी समोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
परंतु व्यावसायिक सिलेंडर देणे बंद केले आहे मात्र घरगुती सिलेंडर दिलेल्या वेळेत मिळणार असल्याचे वरदान गॅस एजन्सी मालक अरविंद जैन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
   गॅस सिलेंडर आपण ऑनलाईन बुक केल्यानंतर आपल्या गावात सोसायटीत गॅस वितरण केले जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गोडाऊन किंवा एजन्सी समोर गर्दी करू नये असे आवाहन एजन्सी मालकाने केले आहे.