Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️पेण पोलीसांची कौतुकास्पद कामगीरी ; दोन्ही गुन्हे उघड करण्यास पेण पोलीसांना मोठे यश .

Responsive Ad Here

✍🏻गडब/अवंतिका म्हात्रे*

मौजे पण भाजी मंडई निधी ट्रेडर्स दुकाना समोर लावलेली एक लाल रंगाची हांडा कंपनीची अॅक्टीव्हा स्कुटी क. एम.एच.०६/सी.बी/१०८४ हि दि. ०९/०३/२०२६ रोजी दि. ०९/०३/२०२६ रोजी १४.३० ते १४.४५ वा.चे सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने स्वतःच्या फायदया करीता चोरी करून नेले म्हणुन फिर्यादी श्री. राजाराम धर्मा म्हात्रे वय ५४ वर्ष, राह-संतोषी माता मदिराजवळ, तांबडशेत पा. जाह ता. पण जि. रायगड यांनी पेण पोलीस ठाणेत तकार दिल्याने पेण पोलीस ठाणे येथे गु.र.नं ३७/२०२६ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाण दि. १०/०३/२०२६ राजी १६. ०८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाचा तपास श्री. जालिंदर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी, पण विभाग पण व श्री. संदिप बागुल, पोलीस निरीक्षक, पेण पोलीस ठाणे यांच्या सुचना प्रमाणे पण पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण कक्षातील अधिकारी व अंमलदार यांनी सुरू केला. तपासादरम्यान सदर गुन्हयाचे घटनास्थळावर कोणतही सी.सी.टि.व्ही फुटेज उपलब्ध नसतांना घटनास्थळाचे आजूबाजूची परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व सदर इसम हा मोटरसायकल स्कुटी घेऊन नागोठणे बाजूकडे गेला असल्याने पेण ते नागोठणे पर्यंत चे सुमारे २५ ते ३० फुटेज तपासून त्याद्वारे आरोपीची गोपनिय बातमीदार मार्फत त्याची ओळख पटवून आरोपी याचा शोध घेऊन तो मिळुन आल्याने त्यास गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली असता त्यांने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले नमुद आरोपीत १) राजेंद्र नथुराम किळंजे उर्फ अबु वय. ४२ वर्षे रा. मराठा आळी, नागोठणे ता. राहा जि. रायगड यास दि. १३/०३/२०२६ रोजी अटक करण्यात आली हयाच दरम्यान पेण पोलीस ठाणे येथे आणखीन एक गुन्हा पेण पोलीस ठाणे गु. र.नं. ३५/२०२६ भा. न्या. संहिता ३०३ (२) प्रमाणे हा दाखल होता. त्याचाही तपास चालु असतांना कोणताही पुरावा उपलब्ध नसतांना कौशल्यपुर्वक चौकशीच्या आधारे केलेल्या तपासात नमुद आरोपीत राजेंद्र नथुराम किळंजे उर्फ अबु वय ४२ वर्ष यांने गुन्हा केल्याचे कबुल केले तपासात दोन्ही गुन्हयात चारी गलला माल 

 *१) २०,०००/- एक लाल रंगाची हांडा कंपनीची अॅक्टीव्हा स्कुटी क. एम.एच. ०६/सी.बी/१०८४ जु.वा. किं. अंदाजे.*

*२) २५,०००/- एक निळया रंगाची टिव्हीएस कंपनीची ज्युपीटर स्कुटी क. एम.एच. ०६/सी.के/७४४२ जु.वा.किं. अंदाज.* 

 *४५,०००/- एकुण*

वरील माल जप्त करण्यात आले व सदरचे दोन्ही गुन्हे उघडकीस आनण्यात पेण पालीस स्टेशनला यश प्राप्त झाले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीम. आंचल दलाल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवधारे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जालिंदर नालकुल, मा. पोलीस निरीक्षक श्री. संदिप बागुल यांच्या सुचनाप्रमाणे गुन्हेप्रकटीकरण कक्षातील अधिकारी १) श्री. निलेश राजपूत सहा. पोलीस निरीक्षक, २) श्री. सुनिल बव्हाण पोलीस उपनिरीक्षक, ३) श्री. राजेश पाटील सहा. पोलीस उपनिरीक्षक, ४) श्री. प्रकाश कोकरे पोहवा / ८६१, ५) श्री. अजिंक्य म्हात्रे पोहवा/१५६८, ६) श्री. सचिन व्हसकोटी पाहवा / ८८५, ७) श्री. सुशांत भोईर पाहवा/१४२४, ८) श्री. अमोल म्हात्रे पाहवा /२३१९, ८) पाहवा /१३५२ सागर खांडस्कर ९) मपाहवा/१३९ सुचित्रा म्हात्रे ९) श्री. गोविंद तलवार पोशि/१९५१, १०) संदिप शिंगाड पाशि/१२४१ यांनी केलेला आहे.