✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
रायगड जिल्ह्यातील पनवेल-रोहा रेल्वे लाईनवर आमटेम या गावी, रेल्वे स्टेशन व्हावे ही मागणी गेल्या ४० वर्षा पासूनची आहे. त्याबाबत रेल्वे प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा करून देखील रेल्वे प्रशासन दाद देत नसल्याने आम्ही आमटेम व लगतच्या ग्रामपंचायती मार्फत आमटेम रेल्वे स्टेशन निर्माण समितीच्या नेतृत्वाखाली दिनांक १७/०१/२०२६ रोजी रेल रोको करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु एस. एम कोतवाल R.P.F कळंबोली यानी दिनांक १६/०१/२०२६ रोजी तरूण कुमार साहेब असिस्टंट डि आर एम (इन्फास्ट्रक्चर) यांच्या दालनात तरूण कुमार साहेब, व मा. ऋषी शुक्ला (मुंबई मुख्य रेल्वे सुरक्षा अधिकारी व इतर अधिकारी यांच्या समवेत व आमच्या शिष्ठमंडला बरोबर बैठक झाली. या बैठकीत कमी अंतराचा मुद्दा पुढे आला. त्यावेळी आम्ही आमटेम कि.
मी १२१/४ ते १२२ या जागेत स्टेशन घ्यावे हा मुद्दा मांडला.
त्यावेळी ऋषी शुक्ला साहेव व तरूण कुमार साहेब यांनी त्या जागेचा सर्व्हे करून योग्य तो निर्णय घेण्याचे मान्य केले व लवकरात लवकर पुन्हा दोन्ही जागेचा सर्व्हे करून घेवू. सर्व्हे करताना आमटेम रेल्वे स्टेशन निर्माण समिती व ग्रामपंचायत आमटेम यांना आगावू सुचना देण्याचे सांगितले. परंतु अद्याप काहीच झालेले नाही. तरी कृपया लवकरात लवकर सुचवलेल्या जागेचा सर्व्हे करण्यात यावा अन्यथा रेल्वे रोको कोणल्याही क्षणी करावा लागेल ही अशा प्रकारचे निवेदन ऋषी शुक्ला साहेब (मुंबई मुख्य रेल्वे सुरक्षा अधिकारी) सी. एस. एम. टी मुंबई. यांना निवेदन आमटेम रेल्वे रेल निर्माण समिती अध्यक्ष भिकाजी कमलाकर नाईक सरपंच लक्ष्मण तांबोळी, यशवंत मोकल यशवंत ठाकुर तुकाराम गायकर यांनी आज दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.