✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार अदिती ताई तटकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पेण उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रात दुःखाचे सावट आहे त्यामुळे हा वाढदिवस फक्त रुग्णांची सेवा करून शांततेच्या मार्गाने साजरा करण्यात आला आहे.यामध्ये पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत, विधानसभा महिला अध्यक्ष वसुधा पाटील, तालुका महिला अध्यक्षा चैताली पाटील, महिला शहराध्यक्ष सुचिता चव्हाण, शहर युवक अध्यक्ष सागर हजारे, जिल्हा सेवादल उपाध्यक्ष मोरेश्वर म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष दीपक गुरव, नगरसेविका सुशीला ठाकूर, माजी सरपंच जिते पंचायत समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे, शिहू जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद तांडेल, तालुका महिला उपाध्यक्ष जयश्री पाटील, तालुका सचिव नरेंद्र म्हात्रे, सेवादल तालुका अध्यक्ष अशोक म्हात्रे, दिव्यांग प्रहार संघटना अध्यक्ष भालचंद्र भगत, तनवी हजारे, तालुका सरचिटणीस अशोक म्हात्रे, कोळी सेल अध्यक्ष बिपीन पाटील, तालुका सहसचिव प्रमोद म्हात्रे, माजी सरपंच तुळशीदास कोठेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.