गडब / अवंतिका म्हात्रे
जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गॅलेक्सी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे आज आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
सदर शिबिरामध्ये स्त्री रोग तज्ञ व प्रस्तुती तज्ञ डॉक्टर नयना जवाहर मुलानी व डॉक्टर तन्वी रोहन पंदारेयांचे प्रमुख मार्गदर्शन सर्व उपस्थित महिलांना शिबिरादरम्यान मिळणार आहे . सदर शिबिर सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत असणार आहे
♦️शिबिराची वैशिष्ट्ये♦️
पाठीचा आजार
अनियमित पाळी पीसीओडी पीसीओएस
स्तनाचे आजार व संबंधित कॅन्सर तपासणी
वारंवार होणारे गर्भपात गर्भाशयाचे आजार
गर्भवती स्त्रियांची तपासणी व मार्गदर्शन
प्रस्तुती नंतर घ्यावयाची काळजी
गर्भधारणे करिता मार्गदर्शन
अंगावरून सफेद पाणी जाणे .
♦️ मोफत तपासणी♦️
CBC
Blood sugar
thyroid
urine (R )
ECG
♦️शिबिरामध्ये नोंदणी केलेल्या रुग्णांना अल्प दरात खालील सुविधा उपलब्ध
गर्भपात शासनमान्य एमटीआर
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया TL
नॉर्मल डिलिव्हरी
सिझर
इत्यादी आजारांवर निदान शिबिरामध्ये मिळणार असल्याने पेण नदीतील व आजूबाजूतील गावातील परिसरातील महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा . तसेच 19 फेब्रुवारी पासूनगॅलेक्सी मध्ये स्पेशालिटी हॉस्पिटल ला महात्मा फुले योजना आभाकार्ड जनआरोग्य पोजन प्रधानमंत्री जनआरोगयोपना
तसेचपिवळा केशरी कार्डधारकांना योजनेमधून योग्य तो उपचार मिळणार आहे .