Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️स्व अजितदादा पवर यांचा अस्थिकलश पेणमध्ये ; खासदार आमदारांसह कार्यकर्त्यांनी घेतले दर्शन♦️

Responsive Ad Here

    ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
      महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश राष्ट्रवादी कार्यालयात आणण्यात आला यावेळी भाजपचे आमदार रविशेठ पाटील खासदार धैर्यशिलदादा पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित् होते . 
     
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ अजितदादा पवार यांचे पवित्र अस्थिकलश संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार असून हा कलश रायगड जिल्ह्यात देखील दाखल झाला आहे या निमित्ताने राष्ट्रवादीसह इतर कार्यकर्त्यांनी त्याचे दर्शन घेता येणार आहे . सर्व जनतेचे लाडके नेतृत्व म्हणजे अजित दादांची ओळख आहे . त्यांना समाजसेवेची आवड होती दादा गेल्याने संपूर्ण महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली असा नेता पुन्हा होणे नाही : असे मत रवि शेठ पाटील यांनी मांडले. 

कोणाच्याही स्वप्नात नसणारी अशी घटना महाराष्ट्रात घडली महाराष्ट्र एका जाणत्या कार्यकर्त्याला जाणत्या राज्यकर्त्याला आणि महाराष्ट्राची जाण असलेल्या एका नेत्याला मुकलेला आहे महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता फक्त आपण दादांच्या विचाराने महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्याचा आहे अस्थिकलश दर्शन घेण्यासाठी खासदार धैर्यशिलदादा पाटील आमदर रविशेठ पाटील राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर तालुका अध्यक्ष दयानंद भगत शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकुर पांडूरंग जाधव भाजप आमदार आघाडीचे विनोद शहा   विकास पाटील सागर हजारे रायगड जिल्हा चिटणीस परशुराम मोकल . नगरसेविका सुशिला ठाकुर तालुका अध्यक्ष चैताली पाटील शहर अध्यक्षा सुचिता चव्हाण विधानसभा सचिव अवंतिका म्हात्रे तालुका उपाध्यक्ष जयश्री पाटील शालन सावंत तन्वी हजारे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .