गडब / सुरेश म्हात्रे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय मा. ना. अजितदादा पवार
यांच्या पवित्र अस्थी कळसाचे दर्शन
पेण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालयात* घेण्यात आले.
यावेळी *राज्यसभा खासदार मा. धैर्यशीलदादा पाटील व आमदार रवीशेठ पाटील यांनी अस्थी कळसाचे श्रद्धेने दर्शन घेतले* व स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
याप्रसंगी पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर तालुका अध्यक्ष दयानंद भगत शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर जिल्हा सेवादल अध्यक्ष गंगाधर पाटील महिला अध्यक्ष चैताली पाटील महिला शहर अध्यक्ष सुचिता चव्हाण युवक अध्यक्ष विकास पाटील युवक शहर अध्यक्ष विकास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा, तालुका, शहर, महिला व युवक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वर्गीय अजितदादा पवार यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏