Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

सोनसाखळी चोरीचा १२ तासात पर्दाफाश; सराईत गुन्हेगार गजाआड;वडखळ पोलिसांची मोठी कारवाई!

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भरवस्तीत घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या बारा तासात छडा लावला आहे मुंबईतील मालार परिसरातून एका सराईत सोडायला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीत वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे अटक करण्यात आलेला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सुलोचना रमेश भालेराव या गुरुवारी सकाळी कामावर जाण्यासाठी उपकार हॉटेल समोरून गोवा रोड कडे पायी जात होत्या सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास समोरून पल्सर मोटरसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात इस्मानी त्यांना गाठले मोटरसायकलवर मागे बसलेल्या चोरट्याने सुलोचना यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून भरधा वेगाने पळ काढला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती घटनेची तक्रार मिळतात वडखळ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच चिपळूण पोलिसांच्या मदतीने आतिफ मोबीन अन्सारी राहणार मालवणी मालाड पश्चिम याला पोलिसांनी वेड्या ठोकल्या पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली त गुन्हेगार असून त्याने यापूर्वी दहा वर्षांची शिक्षाही भोगली आहे न्यायालयाने चला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार आहे ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव पोलीस कर्मचारी रामनाथ ठाकूर भाग्यवान कांबळे अनिल पाटील प्रशांत देसाई रुपेश फोंडे आणि दिनेश घेणे यांच्या पथकाने केली संवेदनशील भागात घडलेल्या या गुन्ह्याचा तत्परतेने तपास लावल्याबद्दल वडखळ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.