Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️(को ए सो ) यांचा २६ वा सेवानिवृत्त मुख्याध्यापक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

Responsive Ad Here
 ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे


पेण येथील सेरीमा हॉटेल, वाशी येथे सेवा निवृत्त मुख्याध्यापक (को.ए.सो.) यांचा २६ वा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात एकूण ८६ सेवानिवृत्त मुख्याध्यापक हजर होते. त्यामध्ये निव्रृत महीला मुख्याध्यापक हजर होते. सकाळ पासून सुरू झालेल्या मेळाव्यात दिवंगत सेवा निवृत्त मुख्याध्यापकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित ७५ वर्षांवरील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मेळाव्यात आपल्या कलागुणांना वाट मोकळी करून बुवासर, बोंद्रे सर, खरसंबळे सर, साठे सर, सोनुने सर, व सौ. खराडे यांनी विविध प्रकारचे करमणूकीचे कार्यक्रम आयोजित करून उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले. 
या मेळाव्यात उल्हास ठाकूर, सोनूने सर, बळवंत वालेकर, जगन्नाथ जांभळे, राजेंद्र म्हात्रे , प्रज्ञा जोशी , वसूधा पितळे  आदींनी आपापल्या शैलीत सेवा काळातील अनुभव व मनोगत व्यक्त केले. पुढील मेळावा महाड येथे आयोजित करण्याचा ठरला. त्याची जबाबदारी मोरे व चिनके सर यांच्या वर सोपवण्यात आली.
सदरील मेळावा संपन्न करण्यासाठी जगन्नाथ जांभळे, उल्हास ठाकूर, व्ही. के. पाटील, व्ही.ए. पाटील, कदम, बहुरुपी, पी.बी.ठाकूर, आर.आर. पाटील, केशव जांभळे, व्हील.जे. म्हात्रे, अशोक ठाकूर, डी.एच.पाटील, डि.व्ही.पाटील, एस.एम. पाटील, सी.ई.ठाकूर, आदींनी मेहनत घेतली.
मेळाव्याच्या शेवटी रायगड भूषण प्राप्त राजेंद्र म्हात्रे यांनी पसायदान गायले.