Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️पेण नजीक खारपाडा दुश्मी रेल्वे ट्रॅक वर आढळला बिबट्या मृतअवस्थेत♦️♦️

Responsive Ad Here

         ✍🏻गडब/ अवंतिका म्हात्रे*

   बिबट्या आज येईल बिबट्या उद्या येईल अशी दहशत ठीक ठिकाणी निर्माण झाली होती मात्र प्रत्यक्षात कधी येईल याचा थांब पत्ता लागला नव्हता आज अखेर तो पेण तालुक्यातील दुश्मी खारपाडा दरम्यान असलेल्या रेल्वे ट्रॅक वर मृत अवस्थेत आढळला आहे. एकंदरीत पाहता असे दिसून येते आहे दृश्मी खारपाडा येथील रेल्वे ट्रॅकवर एका बिबट्याला रेल्वेने
धडक दिली आणि त्या धडकेमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे सदरची घटना ही रात्री घडली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत निष्कर्ष काढले असता असे दिसून येत आहे की येथील ग्रामस्थांना व नागरिकांना कधीही बिबट्याच दर्शन झालं नाही मात्र आज जे दर्शन झालं ते घबराटीचे वातावरण निर्माण मृता अवस्थेत झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये झाले आहे. याकडे राज्य
शासनाने केंद्र शासनाने तात्काळ लक्ष द्यावे आणि या परिसरामध्ये बिबट्याचे दहशत निर्माण होणार नाही याकडे जातीने लक्ष द्यावे असे नागरिकांनी मागणी केली आहे.. खारपाडा ग्रामस्थांशी हितगुज केले असता किंवा संपर्क साधला असता त्यांनी सदर रेल्वे टेकर मृतावस्थेत बिबट्या आढळल्याचे सांगितले.