✍🏻गडब/अवंतिका म्हात्रे*
दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत पार पडलेल्या पेण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काही किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूकपूर्व आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक आणि राजकीय तापमान लक्षात घेता मतदान दिवशीची शांतता पेणकरांसाठी जमेची ठरली. प्रशासनाच्या माहितीनुसार एकूण 70.39 टक्के मतदान झाले. महिला मतदारांचे मतदान 12,208 तर पुरुषांचे 11,606 असे एकूण 23,814 मतदारांनी हक्क बजावला.
यंदाच्या निवडणुकीत 12 प्रभागांतून 24 नगरसेवक आणि एक थेट नगराध्यक्ष निवडून येणार होते. भाजप–राष्ट्रवादी महायुती (24+1), शिवसेना शिंदे गटाची स्वतंत्र लढत, शिशिर धारकर यांची “आम्ही पेणकर आघाडी”, संतोष श्रींगारपुरे यांची “नगरविकास आघाडी”, काँग्रेस-मित्र पक्ष आणि मनसे यांच्या सहभागामुळे बहुकोनी संघर्ष रंगला. दरम्यान, प्रभाग 9-अ मधील वसुधा तुकाराम पाटील यांची बिनविरोध निवड तसेच छाननीत नगराध्यक्ष पदाचा एक व 17 नगरसेवकांचे अर्ज बाद झाल्याने राजकीय समीकरणे बदलली. अभीराज कडू, सुशीला ठाकूर, दीपक गुरव, वसुधा पाटील, मालती म्हात्रे व स्मिता माळी हे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले.
दि. 21 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात नगराध्यक्षपदी प्रीतम पाटील यांनी 5,861 मतांच्या फरकाने विजयाची हॅट्रीक मारली. प्रभाग 8-अ मधील जास्वीन पाटील यांनी 791 मतांनी सर्वाधिक आघाडी घेत विजय संपादन केला. एकूण निकालात भाजप–राष्ट्रवादी महायुतीने 17 नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदावरही वर्चस्व प्रस्थापित केले. “नगरविकास आघाडी”ला 3, “आम्ही पेणकर आघाडी”ला 2 तर शिवसेना (UBT) आणि शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा मिळाली. एकूण 24 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असे सर्व उमेदवार विजयी ठरले.
*मतदानाचा तपशील*
घटक मतदार संख्या मतदान
महिला 17,271 12,208
पुरुष 16,604 11,606
एकूण 33,875 23,814 (70.39%)
*प्रभागनिहाय विजयी उमेदवार*
प्रभाग 1
अ) कलावती पाटील (भाजपा) – 1,148 (85 मतांनी विजयी)
ब) संतोष श्रींगारपुरे(पेण नगर विकास आघाडी ) – 1,170 (131 मतांनी विजयी)
प्रभाग 2
अ) पल्लवी कालेकर (भाजपा) – 1,134 (202 मतांनी विजयी)
ब) प्रवीण शंकर पाटील (आम्ही पेणकर आघाडी) – 1,097 (118 मतांनी विजयी)
प्रभाग 3
अ) सुजाता डाकी (पेण नगर विकास आघाडी ) – 1,344 (587 मतांनी विजयी)
ब) संजय म्हात्रे(पेण नगर विकास आघाडी ) – 1,236 (344 मतांनी विजयी)
प्रभाग 4
अ) अरुणा पाटील (उबाठा शिवसेना) – 911 (101 मतांनी विजयी)
ब) भूषण कडू (शिंदे गट) – 819 (228 मतांनी विजयी)
प्रभाग 5
अ) अंजली जोगळेकर (भाजपा) – 977 (476 मतांनी विजयी)
प्रभाग 6
अ) संगीता लाड (भाजपा) – 1,456 (346 मतांनी विजयी)
ब) आनंद जाधव (राष्ट्रवादी) – 907 (118 मतांनी विजयी)
प्रभाग 7
अ) आफ्रिन अखवारे (भाजपा)– 1,081 (456 मतांनी विजयी)
ब) कृष्णा भोईर सद्दाम (आम्ही पेणकर आघाडी) – 865 (30 मतांनी विजयी)
प्रभाग 8
अ) जास्वीन पाटील (भाजपा) – 1,140 (791 मतांनी विजयी – सर्वाधिक फरक)
ब) अनिरुद्ध पाटील (भाजपा) – 1,114 (750 मतांनी विजयी)
प्रभाग 9
अ) निवृत्ती पाटील (राष्ट्रवादी) – 1,030 (188 मतांनी विजयी)
प्रभाग 10
अ) सुनीता जोशी (भाजपा) – 1,178 (195 मतांनी विजयी)
ब) निळकंठ म्हात्रे (भाजपा)– 1,191 (388 मतांनी विजयी)
*बिनविरोध निवडून आलेले उमेदवार*
अभीराज कडू(भाजपा)
सुशीला ठाकूर (राष्ट्रवादी)
दीपक गुरव (राष्ट्रवादी)
वसुधा पाटील (राष्ट्रवादी)
मालती म्हात्रे(भाजपा)
स्मिता माळी (भाजपा)
*पक्षनिहाय ताकद*
भाजप-राष्ट्रवादी महायुती : 17 नगरसेवक + 1 नगराध्यक्ष
आम्ही पेणकर आघाडी (शिशिर धारकर) : 2
नगरविकास आघाडी (संतोष श्रींगारपुरे) : 3
शिवसेना (UBT) : 1
शिवसेना शिंदे गट : 1
(वरील मतांची आकडेवारी ही कमी जास्त होण्याची शक्यता आहे )