Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️साईनाथ पवार यांना २०२५ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर .

Responsive Ad Here
     ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग येथे कार्यरत असलेले साईनाथ पवार हे दिव्यांग क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत निष्ठेने व समर्पित भावनेने कार्यरत आहेत. दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, हक्क, पुनर्वसन व सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे.

त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या वतीने यंदाचा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 साईनाथ पवार यांना जाहीर करण्यात आला आहे.

हा भव्य पुरस्कार सोहळा दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे पार पडणार असून या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

साईनाथ पवार यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याने दिव्यांग क्षेत्रातून तसेच सामाजिक स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.