गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील गडब ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे नुकताच गडब ग्रामपंचायत कार्यालयात अपंगांना (दिव्यांग) ग्रह उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी गडब ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. मानसी मंगेश पाटील, ग्रामसेवक कृष्णा पाटील तसेच इतर सदस्य उपस्थित होते मात्र यावेळी एक घोल करण्यात आला यावेळी बहुतांश दिव्यांगाना आमंत्रणच नव्हते तरीही सदर ग्रामपंचायती मध्ये कार्यक्रम उरकण्यात आला.
यावेळी मैतांच्या वारसांना ग्रह उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. वास्तविक पाहता जे मयत आहेत त्यांना सदर वस्तू किंवा किड्स देण्याचा अधिकार नव्हता मात्र ग्रामपंचायत कराव (गडब) ते सरपंच आणि ग्रामसेवक यांनी दिव्यांगाना व त्यांच्या मैतांच्या वारसांना ग्रह उपयोगी वस्तू दिल्याने एकच तारांबल उडाली याबाबत सरपंच सौ मानसी पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदर कार्यक्रम पूर्वीचा असल्याने त्यावेळी मयत जिवंत होते म्हणून त्यांची नावे या कार्यक्रमात घेण्यात आली मात्र दोन ते अडीच वर्ष थांबायची गरज काय? सदर कार्यक्रम मागच्या सरपंचाच्या काळातील असल्याने ही चूक लक्षात आली मात्र हे पटण्यासारखे नाही सदर मयत हे इतिहास झाले आहेत त्यांची नावे घेण्यात काय अर्थ याबाबत पत्रकार सुरेश म्हात्रे यांनी वरिष्ठानकडे दाद मागण्याचा निर्धार व्यक्त केला.