Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️नगरपालिका प्रभाग क्रमांक ७ अ मधून मुस्कान झटाम निवडणूक रिंगणात..♦️♦️

Responsive Ad Here

     ✍🏻 गडब/अवंतिका म्हात्रे*

     पेण शहरासह तालुक्यातील सर्वांचेच लक्ष यावेळी नगरपालिका निवडणुकांकडे लागले आहे. या निवडणुकीत बरेच बदल घडणार असल्याचे चित्र दिसून येत आहेत. प्रभाग क्रमांक ७ अ मधून मुस्कान रफिक झटाम यांनी निवडणूक रिंगणात उतरून नगर विकास आघाडी मधून अर्ज दाखल केल्याने विरोधकांना धडकी भरली असल्याचे समजते. कारण मुस्कान झटाम यांचा प्रभाग क्रमांक ७ मध्ये दांडगा संपर्क आहे. त्या नेहमीच समाजासाठी अविरत सेवा करत असून अनेकांना त्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. 

     मुस्कान झटाम आणि त्यांचे पती रफिक झटाम यांनी जणू काही समाजसेवेचे व्रतच हाती घेतले आहे. मुस्कान झटाम यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना घरच्या घरी रोजगार उपलब्ध करून दिल्याने महिलांना सक्षमीकरण करण्याचे काम केले आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे कार्य आहेत. सर्वांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. 



 मुस्कान झटाम यांनी नगर विकास आघाडी कडून अर्ज दाखल केल्याने प्रभाग क्रमांक ७ मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाची माहिती, कर्तुत्व, नेतृत्व त्याचबरोबर वक्तृत्वावर पकड या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मतदारांची साथ आणि वाढता पाठिंबा पाहता मुस्कान झटाम या बहुमताने निवडून येणार असल्याची चर्चा सुरु आहे.