गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील वडखल पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवा गेट येथे संदीप पाटील नावाचा इसम देशी आणि इतर दारू विक्री जोमात करीत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत वडखळ पोलीस ठाण्याच्या ठराविक पोलिसांना माहिती असूनही त्याच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई होत नाही येथील पत्रकार सुरेश म्हात्रे यांनी याबाबत विचारणा केली असता सदर इसम पोलिसांना हप्ते देत असल्याचे निदर्शनास येत आहे.
सदर धंदे वाल्याकडून परप्रांतीय नागरिक मोठ्या प्रमाणात दारू खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले असून सदर दारू विक्री त्यावर कारवाई करावी अशी मागणी समस्त गडब,वडखळ आणि गोवा गेट वासियांकडून होत आहे.