*गडब/ अवंतिका म्हात्रे*
पेण तालुक्यातील गडब ग्रुप ग्रामपंचायत काराव येथे जेडब्ल्यू कंपनीने स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायत काराव येथे ग्रामपंचायत सदस्य उपोषणाला बसले आहेत. त्या अनुषंगाने ग्रुप ग्रामपंचायत च्या सदस्यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की जनसुनावणी दरम्यान कंपनीला पाठिंबा देताना काराव ग्रामपंचायतीने सशर्त पाठिंबा दिला होता त्यावेळी सुद्धा गावातील डिप्लोमा आयटीआय मुलांना रोजगार मिळावा या उद्दिष्टाने पाठींबा दर्शविला होता परंतु आजतागायत कंपनी वेळोवेळी त्यांना आश्वासनच देत आहे .
गेलीअडीच तीन वर्ष काराव ग्रामपंचायतचे सदस्य कंपनी सोबत नोकऱ्यांसदर्भात पाठपुरावा करित आहेत परंतु केपनी प्रशासन त्यांना कोणत्याही प्रकारे दाद देत नसल्याचे उपोषण करत्यांनी पत्रकांराशी बोलताना सांगितले उपोषणाला बसलेले सदस्य हे कंपनीसोबत पत्रव्यवहार चर्चा करत होते मात्र त्यांची आशा संपुष्टात आल्याने अखेर त्यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला .
स्थानिक तरुण हा बेरोजगार असताना परप्रांतीय यांना कंपनी नोकरी देते असे असताना स्थानिक नेते काराव सरपंच व इतर सदस्य शांत राहून तमाशा बघत आहेत कंपनीला अशा परिस्थितीमध्ये हे सहकार्यच म्हणावा लागेल
सदर उपोषनाशासाठी ग्रामपंचायत सदस्य दिनेश म्हात्रे, भाग्यश्री कडू,मुक्ता अंकुश वाघमारे, वैशाली पाटील,दिपाली भोईर आदींचा समावेश आहे . त्यामुळे अनेकांच्या मनात शंका कुशंका येऊन सुक्या बरोबर ओले सुद्धा जळते या म्हणीप्रमाणे सर्व सदस्यांनाच दोष लागण्याचं काम झालं मात्र जनतेच्या प्रश्नांशी प्रामाणिक असणाऱ्यांनी आज उपोषण सुरू केला आहे अशा उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे. सदर उपोषणाला वडखळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव व कर्मचारी उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे, यांनी उपोषण कर्त्यांना मार्गदर्शन करून पाठींब दर्शविला आहे राजू म्हात्रे, व इतर ग्रामस्यांनी ग्रामस्थांनी पाठिंबा दिला.