गडब/सुरेश म्हात्रे
गेली तीन-चार महिन्यापासून रायगड जिल्ह्यात मटका आणि दारू भंगार व्यवसाय बंद आहेत मात्र तरीही वडखल विभागात मटका जोरात चुपके चुपके चालू असल्याचे निदर्शनात येत आहे.मटका या अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी खाकी वाले कार्यतत्पर आहेत मात्र या अवैध धंद्यांकडे वडखल पोलिसांनी नजर जात नाही महत्त्वाची बात म्हणजे,सदर धंदा बस स्थानक व शेजारच्या रिक्षा स्टॅन्डच्या
दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सदर अवैध धंदा सुरुवातीला सुरू असणाऱ्या बोरेकर नावाच्या इस्मा कडून त्याचे हस्तक सदर धंदा करताना दिसतात.मटका माफिया बिंदासपणे हा धंदा करत असून यांच्यावर लगान घालण्यात पोलिसांना अपयश येत असल्यामुळे नागरिकांकडून आश्चर्यव्यक्त होत आहे तसेच मटक्याचे नंबर घेण्यासाठी सोप्या पद्धतीने मटका माफी यांची माणसं देखील कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.