✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
सिद्धांत रायफल शूटिंग रायगड ची नेमबाज अवनी कोळी हिने रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करित 40व्या महाराष्ट्र रायफल संघटना व समीर पाटील शूटिंग स्पोर्ट्स अकॅडमि पालघर येथे दिनांक 21 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2025 आयोजित डबल ट्रॅप शूटिंग शॉटगन स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत ज्युनिअर वूमन डबल ट्रॅप शॉटगन मध्ये सुवर्ण पदक तसेच ज्युनिअर ट्रॅप शूटिंग मध्ये कान्स्य पदकाची कमाई केली
तिच्या ह्या यशाबद्दल क्लब चे अध्यक्ष विजय खारकर, रायगड भूषण राष्ट्रीय नेमबाज सेक्रेटरी किशन खारके, प्रितम पाटील, महेश फुलोरे, अजिंक्य चौधरी, समाधान घोपरकर, प्रकाश दिसले,अविनाश भगत, सुरज थळे,राजु मुंबईकर, अलंकार कोळी प्रशिक्षक, Ralston Coeilo ISSF Certify B Coach ह्यांनी अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या