Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

कासू,वडखल विभागात गांजा विकीचे पेव फुटले वडखळ पोलिसांचे दुर्लक्ष!

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील वडखल आणि कासू विभागात मोठ्या प्रमाणात तरुण पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर असून या गोष्टीची कल्पना स्थानिक वडखल पोलिसांना बोलताना देऊनही कोणतीही कारवाई होत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. 
      कासू विभागातील कारावी गावात एक इसम गांजाची तस्करी करीत असून तो वडखल विभागात गांजा विक्रीसाठी नेत असतो, मागेच वडखल पोलिसांनी एका परप्रांतीय नागरिकाला गांजा विक्री करत असताना रंगे हात पकडले होते व त्याच्यावर वडखल पोलिसांनी कारवाई केली होती हे प्रकरण ताजे असताना करावी गावात एका घरात गांजा विक्री करत असल्याचे निदर्शनात येत आहे याबाबत सदर गांजा विक्री करत असलेला इसम गोवा गेट ते वडखल असा प्रवास करून गांजा विक्री करत आहे, तरी जिल्हा पोलीस प्रमुख अचल दलाल याने जातीने लक्ष घालून सदर गांजा विक्री करणाऱ्या इसमावर कायदेशीर कारवाई करावी अशी समस्त कासू आणि वडखळ विभागातील नागरिकांची मागणी आहे.