Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

प्रकल्पाचे बेकायदेशी बांधकाम तात्काळ थांबवा, मागणी

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे
हेटवणे जलबोगदा प्रकल्पाचे बेकायदेशीर काम तात्काळ थांबवाचे, या मागणीसाठी पेणमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडले. तालुक्याच्या अस्तित्वाशी निगडित 'पाणी वाचवा प्रदूषण रोखा' या लधामुळे आंदोलनाला प्रचंड तीव्रता लाभली आहे.
यावेळी हेटवणे धरणातून मुंबईकडे पाणी वळवण्यासाठी सुरू असलेल्या ३.२ मीटर व्यासाच्या जलबोगद्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी ठामपणे मागणी केली की, परवानगीशिवाय सुरू असलेले हे काम तात्काळ थांबवले पाहिजे. तालुक्याच्या अस्तित्वावर घाला | घालणारा हा बोगदा कोणत्याही
परिस्थितीत चालू देणार नाही, असा शासनावर निष्क्रीयतेचा आरोप ठेवत कार्यकत्यांकडून सांगण्यात आले. तसेच, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झेमसे यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींवर निशाणा साधत, परवानगीशिवाय एवढे भलेमोठे जलबोगद्याचे काम सुरुच कसे होते? हकाचे पाणी पळवले जात असताना प्रतिनिधी एवढे गप्प का बसलेत? असे प्रश्न उपस्थित केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते समीर म्हात्रे, छावा संघटनेचे जितेंद्र ठाकूर, माझं पेणचे राजू पाटील, एमएमआरडीए विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष महेंद्र ठाकूर, संजय थळे, सुनिल धामणकर, गोरख पाटील, सामाजिक कार्यकर्त्या समिधा पाटील, तुषार पाटील, राजू पाटील, मनिषा थवई, शामकांत म्हात्रे, जयसन पाटील, चंदू म्हात्रे, लिलाधर म्हात्रे, किरण म्हात्रे, गणेश
आपल्या डोळ्यांसमोर हक्काचे पाणी पळवण्यासाठी जलबोगद्याचे काम होत आहे. मग प्रशासन व निवडून आलेले प्रतिनिधी एवढे गप्प का बसलेत?
राजेंद्र ड्रोमसे, सामाजिक कार्यकर्ते
तांडेल, प्रभाकर पाटील यांच्यासह असंख्य कार्यकत्यांनी हजेरी लावली. दरम्यान, हेटवणे धरणाचा जलसाठा कमी झाल्यास खारेपाटातील सुपीक शेती व पिण्याच्या पाण्यावर गंभीर प्रश्न निर्माण होईल, असा ठाम इशारा देत आंदोलनकत्यांनी जनतेला जागरूक राहण्याचे आवाहन केले.