✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या महल मीरा डोंगरातील भक्तांचे श्रद्धास्थान म्हणजे व्याघ्रेश्वर मंदिर.. हे मंदिर म्हणजे जागृत देवस्थान आहे...
खूप प्राचीन काळातील हे मंदिर असून पेण तालुक्यातील व आजूबाजूच्या भागातील भाविक भक्त श्रावण महिन्यात शंकराच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.
आता या मंदिराचा विकास होत असून पूर्वीचे मंदिर आणि आताचे मंदिर व मंदिर परिसर यामध्ये सुधारणा होत आहे. रस्ते,लाईट आणि भक्तांना राहण्यासाठी शेडची व्यवस्था झाल्याने भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागतात.पेण, अलिबाग, पनवेल, मुंबई या भागातून आता भक्तांची ओढ वाढत आहे.
आमचा व्याघ्रेश्वर ग्रुप पाटणी हा देखील दरवर्षी खूप श्रद्धेने शंकराच्या भेटीला येथे येत असतो. दरवर्षी श्रावण महिन्यात आम्हाला देवाच्या भेटीची आतुरता लागलेली असते. तेथील शांत, निसर्गरम्य परिसर आम्हाला खुणावत असतो. येथे झालेल्या पदस्पर्शाने आमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. एक वेगळ्या प्रकारचे नवचैतन्य येथे आल्यावर आमच्यात निर्माण होते.
आमच्या मनातील इच्छा आकांक्षा व देवाच्या श्रद्धेपोटी आमचा व्याघ्रेश्वर ग्रुप पाटणी गेली पंधरा वर्षे ही परंपरा अखंड जपत आहे. जवळजवळ दहा वर्षापासून आम्ही दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना प्रसाद रुपी जेवण,नाश्ता देत आहोत. यामध्ये महेंद्र नार्वेकर यांचा सिंहाचा वाटा असतो. हे पुण्याचे काम करून आम्हाला आत्मिक समाधान मिळते.
व्याघ्रेश्वराच्या कृपेने असे धार्मिक कार्य करण्यासाठी आम्हाला बळ मिळू दे. आणि तुमची सेवा आमच्या हातून अखंड घडू दे.अशी व्याघ्रेश्वराच्या चरणी नम्र प्रार्थना.. त्यांची प्राथना असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले
नितीन पाटील,विनायक पाटील, महेंद्र नार्वेकर,राकेश कोंडे अमित चोपडेकर, अनंत पाटील,प्रवीण पाटील, कृष्णा पाटील,विजय पाटील,राजेंद्र पाटील, समीर पाटील, संदीप पाटील,मन्या उमरसकर,राजू ठाकूर,अनिल जाधव,प्रकाश चौगुले, हरिश्चंद्र तांडेल, अरुण बोरकर यांची सालाबाद प्रमाणे विशेष मेहनत दिसून येते .