Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

जनता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, गडब. येथे पालक सहविचार सभा संपन्न!

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे
 जनता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, गडब, या मध्ये आज दिनांक 26 जुलै 2025 रोजी वार -शनिवार..पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पालक, शिक्षकवृंद व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थित पालकांनी आपल्या अडचणी मांडल्या व शाळेच्या विकासासाठी अनेक सकारात्मक सूचना दिल्या. विद्यार्थ्यांचा नियमित उपस्थिती, अभ्यासातील प्रगती, शिस्त व पालक-शाळा यांच्यातील समन्वय या बाबींवर सखोल चर्चा झाली.
मुख्याध्यापकांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच भावी योजना पालकांसमोर मांडल्या. पालकांनीही शाळेच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले व शिक्षकांचा अभिवादन केला.
सभेचा समारोप शाळेच्या शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थितांचे आभार मानून केला. ही सभा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शाळा प्रशासनाने सहकार्य केले.