Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना मा राज्यपाल यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार प्रदान .

Responsive Ad Here

   ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
    रायगड जिल्ह्यातील वडखळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद दशरथ पांढरे यांना दि २९ जुलै २०२५ रोजी मा . राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते राजभवन , मुंबई येथे "राष्ट्रपती " पुरस्कार प्रदान करण्यात आला
 
      सदर पुरस्कार हा त्यांना आतापर्येंत च्या कर्तव्यदक्ष पोलीस दलातील उत्तम कामगीरी बद्दल मिळालेले हे एक मेडल असल्याचे त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले तसेच राजे छात्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राजधानीच्या पावन भुमीच्या ठिकाणी कर्तव्य करताना मिळणे हा त्यांचे मोठे भाग्य आहे .
         त्यांनी वडखळ येथे पदभार स्वीकारल्या पासून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखून आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राखून  केलेल्या अवर्णनीय कामगीरी बद्दल त्यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या संस्थांनी तसेच दैनिक नवराष्ट्र रायगड पुस्कार २०२५ तसेच . कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांची आतापर्यंतची समाजातील किर्ती  पाहता महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदरणीय कुमारी तटकरे यांच्या हस्ते सुद्धा सन्मान मिळाला होता . तसेच सोबती संस्था यांच्या कडून आदर्श पोलीस निरीक्षक म्हणून सुद्धा त्यांना पुरस्कार मिळाला होता तसेच गडब येतील आदर्श युवा संघटना येथून सुद्धा कर्तव्यदक्ष होतकरू आदर्श पोलीस निरीक्षक म्हणून वर्णी झाली होती .
    
     त्यांना मिळालेल्या या या पुरस्कारा बद्दल त्यांचे वडखळ कासू पेण तसेच संपुर्ण रायगड तसेच काल्याण शहापुर ठाणे विभागातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसते
तसचे सामाजिक कार्यकर्ते विभागातील प्रतिष्ठीत नागरीकांनी त्यांचे अभिनंदन केले .
  
*यापुर्वी असे अनेक पोलीस निरीक्षक वडखळ पो .स्टेशनला लाभले परंतु असा कर्तव्यदक्ष मनमिळाऊ सगळ्यांसोबत आपुलकीने वर्तवणुक करणारे अधिकारी यापुर्वी पाहिले नाही पुर्वी लोक पोलीस स्टेशन म्हणजे घाबरायचे पण आपल्या स्वभावाने सर्वांची मने जिंकुण आपुलकीचे नाते निर्माण करणारे   पो अधिकारी आम्हाला लाभले याचा आम्हाला अभिमान आहे .
 *सौ अवंतिका म्हात्रे*