*गडब / अवंतिका म्हात्रे*
आज *रविवार दिनांक २०/०७/२०२५* रोजी *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खासदार सुनीलजी तटकरे साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच *महिला व बालविकास मंत्री ना.अदितीताई तटकरे व मा. आमदार अनिकेतभाई तटकरे* यांच्या सहयोगाने आणि *मिनाक्षी पाटील यांच्या प्रयत्नाने महाडिकवाडी मराठी शाळा क्रमांक ७ समोरील गार्डनचे नुतनीकरण आणि सुशोभीकरणाच्या* कामाचा *नारळ वाढवून उद्घाटन* करण्यात आला.
या प्रसंगी *पेण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, रायगड जिल्हा महिला चिटणीस मिनाक्षी पाटील, काशिनाथ महाडिक, भाऊ जाधव, गजानन रामाणे, दिपक म्हात्रे, शुभांगी म्हात्रे, हेमंत मठ्ठपती, हरेश पाटील, अशोक सावंत, मोहन पाटील, पि.डी. पाटील, खाडे काका, रमेश बामणे, कृष्णा म्हात्रे, आदेश पाटील, शंकर पवार, निलेंद्र खरोसे, सुधाकर घरत, गोपीचंद घरत, शांताराम म्हात्रे, जयेश पाटील, बाळा महाडिक, देवदत्त पाटील, सागर गायकवाड उपस्थित होते
यांच्यासह देवनगरी, गणेश नगर, लोकमान्य सोसायटी* मधील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.