Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️क्रीसिल फाऊंडेशन चे मनीवाईज सेंटर यांच्या फिल्डकॉडेनेट मुले मिळाला एका गरीब कुटुंबाला विमा पॉलिसी चा लाभ♦️♦️

Responsive Ad Here


   ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात दादर गावातील एक गरीब कुटुंबातला तरुण रोड अपघातात मृत्यू मुखी पडला.आई वडीलांच्या हाती पदरी आलेला २१ वर्षाच्या तरुण कु हरेश धनाजी पाटील दि.२५/२/२०२५ रोजी सकाळी ११वाजता या अपघातात मृत्यू पावला त्यांच्या कुटुंबीयांनवर दुःखाचं आभाळ कोसळे अशातच क्रीसिल फाऊंडेशन चे मनीवाईज सेंटर यांच्या फिल्डकॉडेनेट कु. सोनाली निलेश पाटील मु.बळवली यांनी ह्या घटनेची माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना भेटुन क्लेम करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे घेऊन स्टेट बँकेच्या मॅनेजर सरांना भेटुन झालेल्या घटनेची कल्पना दिली. आणि स्वता पुढे होऊन संपूर्ण प्रोसेस पुर्ण केले या करता श्री. कुलकर्णी सर .. श्री विशाल सर... याचे मोलाचे सहकार्य लाभले... सुधागड सेंटर मॅनेजर सौ. संजिवनी शिंदे.. ऐरीया मॅनेजर श्री. वैभव बगाडे सर.. तसेच सौ. सुप्रिया पाशिलकर मॅडम यांनी घटनेचा पाठपुरावा केला.... १२/७/२०२५रोजी या मुलांच्या वडिलांचा फोन आला व असे समजले की १०लाख रुपये रक्कम. त्यांच्या अकाउंटला जमा झाले... आम्ही त्या कुटुंबाची जाऊन भेट घेतली त्यांनी मनिवाईज सेंटर चे हात जोडून आभार मानले .