✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे*
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कै. मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था खारपाडा या संस्थेच्या सभागृहाचे "खा. सुनिल तटकरे सभागृह" हा नामकरण सोहळा महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडला. तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच यांचा सत्कार व इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक करताना दयानंद भगत ह्यांनी सांगितले की तटकरे कुटूंब आणि भगत कुटुंब यांचे स्नेही संबंध १९९२ साली तटकरे साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष व वडील कै मोरेश्वर भगत पंचायत समिती सभापती असताना मी वडिलांचा ड्रायव्हर म्हणून सोबत जात होतो तेव्हा पासून तटकरे साहेब यांच्या बरोबर स्नेह संबंध आले. वडिलांच्या निधनानंतर तटकरे साहेब अनेकवेळा माझ्या सुख दुःखात संकटात उभे राहिले. वडील निधनानंतर वडिलांसारखे राजकीय व सामाजिक क्षेत्रात माझ्या पाठीशी उभे राहिले.
दुष्मी खारपाडा विकासात तटकरे साहेब, अदितीताई व अनिकेतभाई यांचा सिंहाचा वाटा आहे, साहेबांचा अनेक कार्याचा गौरव करीत आज शैक्षणिक सभागृहाला नाव देऊन आमच्या मनातील इच्छा पूर्ण केली.
तसेच मंत्री आदितीताई तटकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, तटकरे कुटुंब व भगत कुटुंब यांच्या स्नेहाच्या नात्याने आज कै. मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्थेच्या सभागृहाला माझे वडील तटकरे साहेब यांचे नाव दिल्या बद्दल त्यांनी संस्थेच्या पदाधिकारी व भगत कुटुंबीयांचे आभार व्यक्त करीत. मी राष्ट्रवादी युवती संघटक असल्या पासून संस्थेच्या अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन, अनेक उपक्रम राबविले असून जिल्हा परिषद अध्यक्ष ते मंत्री पद आज पर्यंत या ग्रामपंचायत हद्दीत विकास कामांना मोठया प्रमाणात प्राधान्य देऊन ग्रामपंचायत सामाजिक सभागृह, नव्याने शाळा, रस्ते पाणीपुरवठा, सोलर लाईट, स्मशान भूमी, गणपती विसर्जन घाट, आदिवासी वाडीवर पाण्याच्या योजना राबविल्या असून संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शिबिरांसाठी महिलांना व विद्यार्थ्यांना लागणारी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पेण विधानसभा महिला राष्ट्रवादी काँग्रेस चिटणीस पदी ललिता ठाकूर व पेण विधानसभा महिला सचिव अवंतिका म्हात्रे यांच्या निवडीचे पत्र मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाला पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, जिल्हा चिटणीस गंगाधर पाटील दादर सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बामणे, जिते प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर पूजा, मुख्याध्यापक प्रवीण पाटील, पेण विधानसभा महिला अध्यक्ष वसुधा पाटील, उद्योजक एकनाथ दुधे, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बोरकर, शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, विधानसभा चिटणीस शांताराम बोरकर, तालुका युवक अध्यक्ष विकास पाटील, विधानसभा सचिव प्रभाकर लांगी, तालुका सचिव नरेंद्र म्हात्रे, शिक्षक सेल अध्यक्ष नथुराम म्हात्रे, तालुका महिला अध्यक्ष चैताली पाटील, शहर महिला अध्यक्ष सुचिता चव्हाण, जिल्हा महिला चिटणीस मीनाक्षी पाटील, विधानसभा सचिव अवंतिका म्हात्रे, पेण विधानसभा चिटणीस ललिता ठाकूर, विध्यार्थी तालुका अध्यक्ष साजन पाटील, वडखळ जि प कार्याध्यक्ष गजानन ठाकूर, जिते पंचायत समिती अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे, दादर जिल्हा परिषद मतदारसंघ अध्यक्ष प्रदीप म्हात्रे, युवती अध्यक्ष मुस्कान झटाम, रफिक झटाम, शेखर पाटील, कैलास जाधव, विशाल फडके, ग्रामपंचायत सदस्य हिरामण घरत, कॉरी असोसिएशन अध्यक्ष अशोक भगत, जेष्ठ नेते कृष्णा ठाकूर, नारायण पाटील, गणपत पाटील, दत्ता जाधव, माजी सरपंच धनाजी भगत, माजी उपसरपंच महादेव भगत, अंगणवाडी सेविका करुणा ठाकूर, कीर्ती देसले, मेघा ठाकूर, अरुणा गावडे, सौ मोरे आणि परिसरातील ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा संस्था अध्यक्ष दयानंद भगत, कै मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्था अध्यक्ष माजी सरपंच रश्मी भगत, वाचनालय उपाध्यक्ष रमेश घरत, वाचनालय सेक्रेटरी कैलास रुठे, दिव्यांग प्रहार संघटना अध्यक्ष भालचंद्र भगत, ग्रामपंचायत सदस्य अनिता भगत, शैक्षणिक उपाध्यक्ष मालती म्हात्रे, माजी सरपंच अरुण घरत, माजी उपसरपंच हासुराम ठाकूर, माजी उपसरपंच नितेश घरत, माजी उपसरपंच मच्छिन्द्र सवार, माजी उपसरपंच सुप्रिया पाटेकर, माजी उपसरपंच श्रेता देसले, भगत कुलदैवत अध्यक्ष विलास भगत, दुष्मी अध्यक्ष भाई देसले, वसंत देसले, अशोक देसले, सदस्य प्रशांत पाटील, ठाकूर पाडा महिला अध्यक्ष कुंदा ठाकूर, सदस्य किरण ठाकूर, पेण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, सदस्य बाबू कोळी, सदस्य अमित भगत, सदस्य देवराम घरत, लता घरत, बाळू यशवंत घरत, रोशन घरत, भगत ट्रान्सपोर्ट खैरासावाडी शाखा अध्यक्ष संजय कातकरी, ग्रामपंचायत सदस्य मछिंद्र कातकरी, युवती अध्यक्ष मेघा पाटील, विजेता म्हात्रे, रामा म्हात्रे, शर्मिला भगत, नीलिमा भगत, सीता पवार, वनिता भगत, अनिता भगत, रेश्मी भगत, सुवर्णा भगत, वैशाली भगत, रमेश ठाकूर यांनी यशस्वी कार्यक्रम पार पाडला.