Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

**************************♦️एसटी महामंडळाचा स्तुत्य उपक्रम ; विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन पास वाटप !

Responsive Ad Here
***********************
    ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

    राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन एसटी पास देण्याचे जाहीर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होताना  दिसत आहे. पेण एसटी आगार मधून या उपक्रमाला सुरुवात झाली असून , आज प्रायव्हेट हायस्कूल, पेण येथे एसटीच्या कर्मचारी सुजाता पाटील यांनी जाऊन विध्यार्थ्यांना सवलत पास दिले. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि त्रास वाचला आहे. पेण एसटी आगारातून दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना साधारणतः अकराशे पास दिले जातात.     या उपक्रमातून आत्तापर्यंत शाळेत जाऊन तीनशे पास वाटप करण्यात आले आहेत.  अशा पेण शहरातील प्रत्येक शाळेत जाऊन हा उपक्रम राबविला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी लागणारा वेळ बचत होऊन तो वेळ अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरेल. शाळेत पास मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पेण आगार व्यवस्थापक, अपर्णा वर्तक
शाळेत पास दिल्याने मुलांचा वेळ वाया जाणार नाही. आणि हे काम करताना आम्हाला सुध्दा समाधान वाटत आहे. ग्रामीण भागातील येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा होईल. तसेच एकाच दिवशी जास्त पास गेल्याने एसटी महामंडळाला उत्पन्न मिळेल.

अथर्व जंगम, विध्यार्थी, पेण प्रायव्हेट हायस्कूल.
एसटी महामंडळाकडून आम्हाला शाळेत सवलत पास मिळाल्याने आमचा त्रास कमी झाला. प्रवास खर्च बचत होईल. याबद्दल एसटी महामंडळाचे आभार.