✍🏻गडब / अवंतिका म्हात्र
आज दिनांक 29 जून वार रविवार रोजी ग्रुप ग्रामपंचायत चरईखुर्द 15 वा वित्त आयोग मार्फत ग्रामपंचायत हद्दीतील बेलघर चरईखुर्द खैराट चरई गौळवाडी चरई आदिवासीवाडी ह्या 5 अंगणवाडी मधील 40 विद्यार्थ्यांना गणवेश व दफ्तर वाटप करण्यात आले तसेच ग्रामपंचायत हद्दीतील 5 प्राथमिक शाळांना स्पीकर माईक सेट वाटप करण्यात आले ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. महादेव शिंदे साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती तळा तसेच मा. श्री. ऍड. उत्तमजी जाधव साहेब सामाजिक न्याय व विधी विभाग जिल्हाध्यक्ष त्यांच्या समवेत ग्रुप ग्रामपंचायत चरई खुर्द सरपंच श्री. प्रविण आंबार्ले श्री. लक्ष्मण भोईर उपसरपंच श्री. अजय सावंत सदस्य सौ.रश्मी आंबार्ले सदस्य श्री. वैभव कदम अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी विजय आंबार्ले अंगणवाडी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पालक उपस्थित होते*
*मा.श्री. महादेव शिंदे साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती तळा यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना ग्रुप ग्रामपंचायत चरई खुर्द नवनवीन स्तुत्य उपक्रम राबवत असते माझ्या कार्यकाळात आज तळा तालुक्यातील प्रथम कार्यक्रम ते पण माझ्या हस्ते अंगणवाडी विद्यार्थ्यांना गणवेश व दफ्तर वाटप आहे याचा मला आनंद आहे ज्यांना ह्या वस्तू मिळाल्या त्यांच्या चेहऱ्यावर असणारे हास्य हेच ह्या कार्यक्रमाचे फळीत आहे असेच नवीन कार्यक्रम आपण करा ग्रामपंचायत हद्दीतील सर्व जनतेला शासनाच्या योजना उपक्रम यांचा लाभ दया काही अडचण असल्यास आमच्या कार्यालय कडे संपर्क करा आम्ही सुद्धा मदत नक्की करू*
मा. सरपंच प्रविण आंबार्ले यांनी आलेल्या मान्यवर यांचे आभार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आपल्या ग्रामपंचायतचा संकल्प आहे की प्राथमिक शाळेना राज्य सरकार मोफत गणवेश देतो पण अंगणवाडी मधील चिमुकल्याना देत नाही त्यांना सुद्धा शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी म्हणून आम्ही गेले 2 वर्ष ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपक्रम घेत आहोत* *प्राथमिक शाळेतील विद्यार्थीना त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी हे स्पीकर सेट उपयोगी येतील याचा मनस्वी आनंद आहे. सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचे समारोप केले.