*गडब/अवंतिका म्हात्रे*
सोमनाथ घार्गे रायगडचे पोलीस अधीक्षक असताना रायगड जिल्ह्यात लेट नाईट अवैध लेडीज बार, मटका चिमणी पाखर जुगार, डिझेल तस्करी सारखे अवैध धंदे तेजीत सुरु होते अनेकदा कारवाई होऊनही धंदे घार्गेच्या आशीर्वादाने सुरूच होते मात्र आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रियाशक्तीच्या हातात रायगड पोलीस अधीक्षकांचा कारभार दिला असून आंचल दलाल यांची रायगढ़ जिल्ह्याच्या नवीन पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. दलाल यांनी यापूर्वी पोलीस उपायुक्तपदाचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केला असून त्यांच्या राज्यात कायदा व सुव्यवस्था कडक राखण्याचे काम केले जात होते. दलाल यांच्यापुढे रायगड जिल्ह्यातील प्रमुख डिझेल तस्करी व मटका चिमणी पाखर जुगार रोखण्याचे आव्हान असून त्या हे आवाहन कसे पेलतात याकडे रायगड वासियांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ धागे यांची बदली अहिल्या नगरला झाली आहे. त्यांच्या जागी लेडी सिंगम म्हणून ओळख असणाऱ्या आंचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या हाती आता रायगड पोलिसांचे सूत्र असणार आहे. कर्तव्यदक्ष कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांनी अल्पावधीतच ठसा उमटवला आहे.
२०१७ च्या युपीएससी परीक्षेत १३६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांची आयपीएससाठी निवड झाली, त्यांनी यासाठी खूप तयारी आणि संघर्ष केलेला आहे. त्या सोबतच याआधी त्यांनी रेल्वे मध्ये सुद्धा अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. आंचल दलाल या मूळच्या उत्तर प्रदेशातील शामली या जिल्ह्यातील आहेत. आयपीएस म्हणून निवड होण्याआधी त्यांनी नागपूर येथे भारतीय रेल्वेतही कार्यभार पाहिला होता. सातारा येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले. त्यांची सांगली येथे बदली झाली होती. त्यानंतर सातारा येथे अपर पोलिस अधीक्षकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. साताऱ्यात असताना त्यांनी जुगाऱ्यांवर धड़क कारवाया केल्या होत्या. तसेच महाविद्यालय परिसरात होणारे छेडछाडीचे प्रकारही त्यांनी आटोक्यात आणले होते. राज्य राखीव पोलीस दल पुणे या ठिकाणी समादेशक या पदावर त्या कार्यरत होत्या. त्यांना रायगड पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी गृह विभागाने सोपवली आहे. त्यांचे पती आणि बंधू दोघेही सनदी अधिकारी आहेत.