गडब/सुरेश म्हात्रे
पेण शहरातील एका विवाहितेने आपला सासरा सूर्यकांत उर्फ, सुरेश शेठ,जोमा पाटील, सासू लक्ष्मी सूर्यकांत पाटील, भरत सूर्यकांत पाटील (दीर) , रचना भरत पाटील(जाऊ) व पती अमर सूर्यकांत पाटील यांनी कौटुंबिक जाच करून तसेच आई-वडिलांकडून रोख रकमेची व सोन्याच्या दागिन्यांची मागणी करून मारहाण करून हुंड्यासाठी त्रास देऊन जिवे ठार मारण्याची धमकी दिल्या बाबत पेण पोलीस ठाण्यात प्रज्ञा अमर पाटील हिने दि. २८/३/२०२५ रोजी तक्रार दिली आहे याबाबत तक्रार दिली आहे मात्र कोणत्याही प्रकारे पोलीस दखल घेत नसल्याबाबत पेण येथे साई शहारा हॉटेल येथे पत्रकार परिषद घेऊन कैफियत मांडली.
त्यांनी पुढे सांगितले की माझे सासरे दीर नणंद आणि पती अमर सूर्यकांत पाटील तसेच जाऊ रचना भरत पाटील यांनी माझ्याकडून सोने व पैशांची मागणी केली आहे. तसेच उंबर्डे तरणकोप तालुका अलिबाग येथे देखील गाड्या पुरवण्याचे काम माझे सासरे करत असून सदरच्या व्यवसाय करता त्यांना आवश्यक ते भांडवल कमी पडून लागल्याने त्यांनी मला हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक चल तसेच जाच करण्यास सुरुवात केली आहे.
मागेच या संदर्भात दि.२/८/२०२४ रोजी पेण पोलीस ठाण्यात या चौघान विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे मी सध्या स्थितीला पेण येथे राहत असून तेथील ब्लॉक सासरे यांच्या नावावर असून मला व नवरा,सासू,दिर कधीही रात्री अप रात्री तसेच दिवसाढवल्या घरात येऊन मला हुंड्यासाठी मारहाण तसेच मानसिक व शारीरिक चल करत आहेत आशे तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील यांनी सांगितले.