Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

*अलिबाग येथे पत्रकारांसाठी खुली कार्यशाळा संपन्न*

Responsive Ad Here
    ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
     अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता एक दिवसीय रायगड जिल्ह्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .   पत्रकारीतेशी निगडीत विवीध विषयांवर तज्ञांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले . 
     रायगड जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ही कार्यशाळा खुली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवीला होता अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते .

     चिंतामणराव केळकर विद्यालयात  ही कार्यशाळा संपन्न झाली उद्घाटनाला अलिबाग जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी, रायगडचे  पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, आरसीएफ थळचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, आणि  रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे आदी उपस्थित प्रमुख पाहुणे उपस्थित होते 
    
    या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात दैनिक सकाळचे उपसंपादक वैभव चाळके यांनी बातमीची भाषा आणि व्याकरण यावर मार्गदर्शन केले . यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, यांनी पत्रकारीतेचे बदलते स्वरूप यावर् मार्गदर्शन केले . तर कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात मुंबईतील प्रसिध्द मानसोपचारतज्ञ मानसिक ताणतणावांचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले . आरसीएफ थळ यांनी या कार्यशाळेच्या आयोजनात सहकार्य केले .
    रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी ही कार्यशाळा खुली असून कार्यशाळेतील आपला सहभाग नोंदवून या कायशाळेचा लाभ घेतला  भारत रांजणकर आणि राजेश भोस्तेकर आणिअलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने या कार्यशाळे चे आयोजन करण्यात आले होते .