गडब / सुरेश म्हात्रे
गडब ता पेण येथील महिलेने उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेला शशिकला पद्माकर मढवी राहणार मौजे वय वर्ष ४५ या महिलेने धक्का बुक्की व मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून वडखळ पोलीस ठाण्यात १५ / २४ भादवी कलम ३२३, ५०४, ५०६, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,गडब येथील एक महिला आपले दिलेले उसने पैसे मागण्यासाठी सौ शशिकला मढवी हिच्या घरी गेली असता सदर महिलेने मला मिळतील तसे पैसे देईन असे म्हणाली त्यावर तक्रारदार महिलेने गेली वर्षभर पैसे देते - देते सांगुन आजपर्यत एकही रुपया दिला नाहीस आता मला पैशाची गरज आहे असे ती म्हणाली परंतु शशिकला मढवी ही अवाच्च भाषेत अश्लिल शिवीगाळ करू लागली व धक्काबुक्की मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली . तेव्हा सदर महिलेने शशिकला पदमाकर मढवी हिच्या विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदविला आहे .
अधिक तपास पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्ग दर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही . पी . म्हात्रे हे करित आहेत .
सदर महिलेपासून कासू विभागातील जनतेने उसने पैसे देताना सावधानता बाळगावी असे अवाहन करण्यात येत आहे .