Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरक्कमी लाभ मिळणार: ना. तटकरे

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरक्कमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे १ एप्रिल २०२२ पासूनच्या सुमारे ५ हजार ६०५ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरक्कमी लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये १ लाखापर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये ७५ हजारांपर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी
कर्मचाऱ्यांच्या दिनांक १ एप्रिल, २०२२ पासून ते त्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इ. प्रकरणी शासनामार्फत एकरक्कमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक ३० एप्रिल २०२४ मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. असेही ना. तटकरे यांनी यावेळी सांगितले.