Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

पेण तालुका राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्ष पदी सौ अवंतिका म्हात्रे यांची निवड ; खा. सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

Responsive Ad Here
     ✍️गडब /सुरेश म्हात्रे .
     
     मा. श्री अजितदादा पवार व खासदार सुनिलजी तटकरे मा. आदितीताई तटकरे ( महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य ) व मा श्री अनिकेतभाई तटकरे ( आमदार विधान परिषद यांच्या राष्ट्रवादी विचाराने प्रभावीत महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी सौ अर्वतिका सुरेश म्हात्रे गडब यांची निवड झाली आहे
        खासदार सुनिल तटकरे हे कोकण रेल्वेचे भुयारीमार्ग बांधण्याचे नुतनीकरण करण्यासाठी रोडे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी खा.सुनिल तटकरे यांच्या हस्ते सौ अवंतिका सुरेश म्हात्रे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले .
    
            यावेळी पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दयानंद भगत पेण तालुका राष्ट्रवादी च्या महिला अध्यक्षा चैताली पाटील पेण शहर अध्यक्ष सुचित्रा चव्हाण रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस आत्माराम म्हात्रे . नरेंद्र ठाकुर, योगेश पाटील सामाजिक कार्यकर्ते अनिल शेठ म्हात्रे सचिन म्हात्रे परशुराम मोकल प्रकाश बांधनकर मोरेश्वर म्हात्रे गायकर आदी राष्टवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते .
     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धैर्य धोरणांचे पालन करून संघटन वाढविण्या करिता अविरत प्रयत्न करताना मोठ्यांचे आशीर्वाद, सोबत्याचे मार्गदर्शन , व लहानांचे सहकार्य घेत पुढील वाटचाली करता मी सदैव प्रयत्नशील राहीन असे सौ . अवंतिका म्हात्रे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगीतले .