Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारोदारी* !

Responsive Ad Here
गडब / अवंतिका म्हात्रे 
       शासन सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी कल्याणकारी योजना राबवते मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य माणसाला शासकीय कार्यालयांची उंबरटे झिजवावे लागतात. यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग अध्यायावत यंत्रणा आणि सर्वसामान्य माणसाची सौजन्याने बोलण्याची भाषा असणे गरजेचे आहे. याकरिता सद्या अस्तित्वात असलेली पद्धत तालुका पातळीवरील कार्यालयांमध्ये बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रतील प्रत्येक नागरिकाला आपल्या विविध प्रकारच्या कामांसाठी कोणत्या ना कोणत्या कामासाठी कुठले तरी दाखले, प्रमाणपत्र, मंजुरी, जमीन खरेदी विक्री व्यवहारातले दाखले, न्यायालयीन कामकाज, जमीन मोजणी, शालेय प्रमाणपत्रे, शालेय कामकाजासाठी लागणारे दाखले, मंत्रालयीन काम स्तरावरील दाखले, आदी कामांसाठी शासकीय कार्यालयाचे उंबरटे झिजवावे लागतात. मात्र शासकीय स्तरावरील कामे करताना नागरिकांना अनेक यातना सोसाव्या लागतात. आज साहेब नाहीत, दाखला तयार नाही, सही झाली नाही, नेटवर्क नाही, साहेब तालुका पातळीवरील मिटिंगसाठी जिल्ह्याला गेले आहेत
   साहेब मंत्री महोदयांच्या दौऱ्यामध्ये व्यस्त आहेत ,साहेब मंत्रालयात गेले आहेत ,साहेब विभागीय आयुक्त कार्यालयात गेले आहेत ,साहेब न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात गेले आहेत, साहेब रजेवर आहेत ,साहेब पाहणी दौऱ्यासाठी गेले आहेत, साहेब व्हिडिओ कॉन्फरन्स साठी गेले आहेत अशी अनेक कारणे ऐकून नागरिकांना शासकीय कार्यालयाचे उंबरटे झिजून नाकी नऊ येत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काही वर्षांपूर्वी शासनाने डिजिटल भारत च्या नावाखाली संकेत स्थळे आणि ऑनलाईन कामकाजावर भर दिला मात्र अनेक पळवाटा ठेवत या ऑनलाइन कामात देखील नागरिकांना ऑफलाईन काम करावेच लागत असल्याचे चित्र तालुका पातळीवर प्रत्येक कार्यालयात पाहण्यास मिळत आहे.
एका एका दाखल्यासाठी कार्यालयांमधून अनेकदा फेऱ्या मारावे लागतात. याशिवाय शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या भाषा ऐकून आता दाखला नकोच अशी मानसिकता नागरिकांची तयार होते
        राज्यातील सर्व ठिकाणच्या जिल्हा परिषद कार्यालय आणि इतर शासकीय कार्यालयात नागरिकांना वेळेत गेले तरी शासकीय अधिकारी वेळेत हजर होत नसल्याने नागरिकांना तासनतास वाट बघावी लागत आहे. जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडो किलोमीटरचा प्रवास करून दुपारी गेल्यानंतर कार्यालयातील कर्मचारी जेवायला गेलेत हे एकावयास मिळते. आधीच कार्यालयीन वेळेत हजर न राहिलेला कर्मचारी अधिकारी किमान दोन तास काम करून दुपारी लगेच जेवायला जातो जेवायला गेलेला अधिकारी कर्मचारी हा सुमारे एक तासाने पुन्हा चहा घेण्यासाठी जातो तोपर्यंत दुपारचे तीन वाजलेले असतात बिचाऱ्या नागरिकांना शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा घरी जायचे असते. त्यामुळे तो उपाशी राहून अधिकाऱ्याची वाट पाहतो आलेला अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात आल्यावर थातुर मातुर उत्तर देतो हे उत्तर ऐकून पुन्हा हा नागरिक आल्या पावली माघारी फिरतो असे अनेक वेळा केल्यानंतर कधीतरी त्याचे काम होते. अशीच अवस्था तालुकास्तरीय कार्यालयांमधून देखील पहावयास मिळते.
राज्यातील जिल्हा पातळीपासून तालुका पातळी पर्यंत नागरिकांना दाखल्यांसाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी शासनाने ठोस उपाय योजना केली पाहिजे. शासनाने महसूल विभागामधून सेतू कार्यालय सुरू केले असले तरी या सेतू मधून देखील नागरिकांना दिवसेंदिवस फेरी मारावीच लागते. नोकरीसाठी देखील युवकांना अर्ज भरताना लागणाऱ्या कागदपत्रांसाठी वण वण भटकावे लागते.
राज्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागामधून अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने दोन किंवा तीन ग्रामपंचायती एकेका ग्रामसेवकाकडे आहेत तशीच अवस्था तलाठी सजा कार्यालयातील तलाठ्यांची आहे. यामुळे ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात गेलेल्या नागरिकाला देखील आज तलाठी आले नाहीत. दुसऱ्या गावात आहेत असेच कारण ऐकायला मिळते. दाखल्यांची कामे किंवा एखाद्या कामाच्या मंजुरीसाठी शासनाने एक आधुनिक पद्धत सुरू केली पाहिजे. कार्यालयातील कर्मचारी अधिकारी वेळेत हजर राहिल्यास शेकडो किलोमीटर प्रवास करून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही. तलाठी अथवा ग्रामसेवक हे त्यांच्याकडे वापरात असणारे मोबाईल नंबर प्रत्यक्षात तो कधीच लागत नसल्याचे नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे.
शासन आपल्या दारी अशा कार्यक्रमांवर करोडो रुपये खर्च करत बसण्यापेक्षा जिल्हा पातळी ते तालुका पातळी ते ग्राम पातळीपर्यंत असणाऱ्या सर्व कार्यालयातील पद्धतीमध्ये बदल केल्यास ग्रामीण भागातून तालुका पातळीवर व तालुका पातळीवरून जिल्हा पातळीवर येणाऱ्या गरजू नागरिकांना याचा पर्यायाने शासनाच्या योजनांचा फायदा होईल अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
    आपल्याला पात ठरलेल्या योजनांचा लाभ घेता यावा या शासनाच्या इतर विभागांच्या योधनांची माहिती घेते अर्ज करता यावा याकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे त्ता माणगाव जि रायगड या ठिकाणी ५ जानेवारी २०२४ रोजी "शासन आपल्या दारी" या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी व कमेचारी एकाच ठिकाणी एकाच छताखाली केवळे शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी उपस्थित असणार आहेत .