Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर जिल्हा वाहतूक शाखेने कारवाई केली. त्यानुसार सुमारे २ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील वर्षी ४० जणांवर कारवाई करीत सुमारे ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.
जिल्ह्यात मोटार अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत 'ड्रंक अँड ड्राइव्ह'ची मोहीम हाती घेतली आहे. रायगडात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे
वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांनी मद्यप्राशनकरून मोटार चालविणाऱ्या वाहकांना चाप बसण्यासाठी आता नाक्यानाक्यावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त लावीत ब्रेथ अॅनिलायझर लावण्यात आले होते. सुमारे ९० मद्यपींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील तिन महिन्यात सुमारे २ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दोन लाखांचा दंड वसूल
अनेक वाहनचालक हे बेशिस्तपणे तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालवत असतात. तर काही वाहनचालक हे दारु पिऊन वाहन चालवत असतात. अशा वाहनचालकांमुळे अपघात होऊन त्यात निष्पाप लोकांचा बळी जात असल्यामुळे वाहनचालकांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये असे अवाहन पोलिसांनी नागरिकांना केले होते. मात्र काही ठिकाणी नागरीकांनी मद्य पिऊन वाहन चालविण्याचे प्रकार घडले तेथे वाहतुक पोलिसांनी कारवाई केली.