Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

शाळेसाठी पाण्याचा फिल्टर भेट

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे 

पेण तालुक्यातील कासु येथील शारदा विद्या मंदिरात समाजसेवक नागेश गावंड यांच्या पुढाकाराने शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरचे वाटप करण्यात आले. कासु येथील या शाळेतील शिक्षकांनी समाजसेवक नागेश गावंड यांच्याकडे शाळेतील मुलांना जे पिण्याचे पाणी मिळते ते अशुद्ध येत असल्याची व्यथा मांडली होती. त्या गोष्टीचा विचार करून नागेश गावंड यांनी जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत फोमन यांच्याकडे तातडीने ही समस्या मांडून काही दिवसांतच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा फिल्टर उपलब्ध करून दिला.
शाळेच्या सप्ताह कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या दिवशी हे फिल्टर बसवून त्याचा शुभारंभ शाळेच्या मुख्याध्यापिका,
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत समाजसेवक नागेश गावंड यांच्या हस्ते पार पाडून विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. या उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापिका सुजाता कांबळे, सह शिक्षक राजेश पाटील, अवधुत कोळी, दत्तात्रेय गोसावी, शशिकांत कोटे,निलेश पाटील, उज्वला पाटील, संदीप वसावे, ग्रंथपाल अमृत दिवाण, युवा नेतृत्व तन्मय गावंड उपस्थित होते. नागेश गावंड यांनी अशा प्रकारचे पिण्याच्या पाण्याचे पुण्य लाभेल असे समाजकार्य केल्याबद्दल मुख्याध्यापिका सुजाता कांबळे यांनी त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानले.