गडब/सुरेश म्हात्रे
शाळांच्या बाबतीत सध्या स्पर्धेचे युग असून शिक्षणा बरोबर सुसज्ज शाळा इमारत बांधण्याचा सर्वच संस्था प्रयत्न करत असतात. शहरासोबत ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी सुसज्ज इमारतीसाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असते. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज जोहे येथे रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सीटी यांच्या सहकार्याने नूतन स्वच्छतागृह, सोलर पॅनल व 120 बेंचेसचे हस्तांतरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे रायगड विभाग प्रमुख प्रकाश हाके, स्कॉर्पिओ मरीन मॅनेजमेंट इंडिया कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्ट कॅप्टन तरुण कुमार, रोटरी ठाणेचे माजी अध्यक्ष संतोष शिंदे, विद्यमान चंद्रशेखर लिमये, कॅप्टन प्रसाद तेंडुलकर, कॅप्टन सुरेश कल्याणकर, ललित माने, आजीव सेवक एस.आर.बेडगे, निरीक्षक संजय महाजन, सुरेश पाटील, पेण कॉलेज प्राचार्य बाळासाहेब दुधाळे, चेअरमन अशोक मोकल, उपाध्यक्ष रा.ल.पाटील, मुख्याध्यापक एस.आर.पाटील, अर्चना कटके, स्कुल कमिटी सदस्य काशिनाथ पाटील, देवा पेरवी, तुळशीदास पाटील, लहू पाटील, पांडुरंग घरत, लव्हेद्र मोकल, रामभाऊ मोकल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रकाश हाके यांनी सांगितले की, बापूजींनी त्या काळात आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत महाराष्ट्रच्या अनेक जिल्ह्यांत व कर्नाटक बेळगाव मध्ये शाळा सुरू केल्या. रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक स्थर सुधारण्याचा काम बापूजींमुळे सुरू आहे. रोटरी क्लबचे मदतीचे हात जिथे जिथे लागतात तिथे नक्कीच कायापालट होतं सोन्यासारखे कामही होते. बापूजींनी सुरू।केलेले शिक्षण वाढविण्याचे काम सध्या रोटरी करत असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरा पेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविले असून विद्यार्थी खूप हुशार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला चालना व प्रोत्साहन मिळाले तर भविष्यात प्रत्येक क्षेत्रात बदल घडवू शकतात. मात्र त्यांना शहरासारखी सुसज्ज इमारत असणे काळाची गरज झाली आहे. यावेळी त्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी पाठविलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखविला.
तर प्रास्ताविक करताना प्राचार्य एस आर पाटील यांनी सांगितले की, आमच्या विद्यालयास शासकीय अनुदान नाही. फक्त शिक्षकांची पगारे शासन करत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची फी आकारली जात नाही. परिसरातील 10 किलोमीटर मधील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. शाळेची सदर इमारत 55 वर्षांची जुनी इमारत आहे. 1961 साली बापूजींनी स्थानिकांच्या सहकार्याने कौलारू शाळा बांधली. मात्र रोटरी क्लब व समाजातील दानशूर व्यक्तींमुळे शाळेच्या इमारतीचे नुतिनिकरण सुरू आहे. तसेच विद्यार्थ्यांसह स्वामी विवेकानंद संस्थेच्या शाळांसाठी यापुढे कायम सहकार्य करणार असल्याचे आश्वासन स्कॉर्पिओ कंपनीचे तरुण कुमार यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.आर.पाटील तर सुत्रसंचलन स्नेहल वर्तक आणि आभार गोरे सर यांनी मानले.