Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

गॅलेक्सी हॉस्पिटलला पेण डी वाय एस पी शिवाजी फडतरे यांनी दिली सदिच्छा भेट पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी 8 जानेवारी 2024 ला मोफत आरोग्य तपासणी

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

पेणचे उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) शिवाजी फडतरे यांनी सदिच्छा भेट देऊन हॉस्पिटलमधील सोयीसुविधांबाबत चर्चा केली. यावेळी पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी 8 जानेवारी 2024 ला मोफत आरोग्य तपासणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये भेट दिल्यानंतर डॉ. रत्नदीप गवळी व राजेश टेलर यांनी त्यांचे आपुलकीने संवाद साधला. यावेळी शिवाजी फडतरे यांच्यासह एल के म्हात्रे, जेष्ठ पत्रकार विजय मोकल उपस्थित होते.गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉ. रत्नदीप गवळी, राजेश टेलर, डॉ. सुनील कांबळे, डॉ. नयना जवाहरमलाणी, डॉ. नयन ब्रम्हे यांच्यासह कर्मचारी वर्गाने त्यांचे यथोचित स्वागत केले.

लवकरच हे हॉस्पिटल नव्या जागेत स्थलांतरित होत होणार असून शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचा मानस असल्याचे डॉ रत्नदीप गवळी यांनी शिवाजी फडतरे यांच्यासमोर व्यक्त केला. त्यादृष्टीने पेण तालुक्यातील ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबीर भरविण्यात येत आहेत. या शिबिरात सामान्य तपासणी, मधुमेह, रक्त दाब तपासणी, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी, ताप, सर्दी, खोकला, रक्ताची कमी, श्वास घेण्यास त्रास होणे, स्त्री रोग तपासणी, अनियमीत मासिक पाळी, नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी, काचबिंदू तपासणी, रेटिना चेकअप, चष्म्याचा नंबर काढणे, इ.सी.जी., पी.सी.ओ.डी., पी.सी.ओ.एस. व इतर तपासण्या करण्यात येतात. तसेच मोफत औषधे व चष्म्ये वाटप करण्यात येत असल्याचे डॉ. रत्नदीप यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी अहोरात्र
सतर्क राहून सेवा करीत असतात. वेळेवर जेवण - पाणी मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी व्हावी यासाठी 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते 3