Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️गणेशोत्सव कालावधीसाठीपनवेल-चिपळूण रेल्वेची मेमू सेवा धावणार, कोकण रेल्वेचे तिकीट फक्त पन्नास रुपये♦️

Responsive Ad Here
गडब/अवंतिका म्हात्रे

  कोकण रेल्वेतर्फे पनवेल-चिपळूण रेल्वेची डीएमयू सेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी ही थेट रेल्वे सेवा सुरू केली आहे. शुक्रवारी पनवेल रेल्वेस्थानक सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. या प्रवासाचे तिकीट अवघे ५० रुपये असेल. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवास सुखकर व्हावा यासाठी गणेशोत्सव कालावधीत विशेष रेल्वेच्या फेऱ्या सोडण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आता गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर पनवेल ते चिपळूण दरम्यान मेमू स्पेशल गाडी चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत ही गाडी धावणार आहे.