Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

⭕शिंदे फडणवीस सरकारमधील - पहिली महिला मंत्री, अदिती तटकरेंनी घेतली शपथ.⭕

Responsive Ad Here
   
 गडब/अवंतिका म्हात्रे

 राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
   अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री बनले तर अदिती तटकरे यांच्या रुपाने शिंदे- फडणवीस सरकारला पहिली महिला मंत्री मिळाली. यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याने टीका केली जात होती. आता राष्ट्रवादी सोबत आल्याने अदिती तटकरे यांना शिंदे फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री बनण्याचा मान मिळाला आहे.

 *कोणी शपथ घेतली?* 

अजित पवार - उपमुख्यमंत्री 
छगन भुजबळ -मंत्री
हसन मुश्रीफ - मंत्री
दिलीप वळसे पाटील - मंत्री
धनंजय मुंडे - मंत्री
अदिती तटकरे - मंत्री
अनिल भाईदास पाटील - मंत्री
बाबुराव अत्राम मंत्री
संजय बनसोडे - मंत्री

 *दोन खासदारांचीही उपस्थिती* 

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारच नव्हे तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हे हे दोन्ही खासदार उपस्थित आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.