*गडब / अवंतिका म्हात्रे*
रायगड जिलह्यातील खालापूर तालुक्यातील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी ठाकूर वसाहतीवर दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. चौक गावापासून साधारण ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे. यामध्ये 50 ते 60 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव कार्य सुरु आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साधारण वाडीवर 48 घरं होती त्यापैके 25 ते 30 घरं मलब्याखाली जाऊन 50 ते 60 जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव कार्यात 65 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे, त्यामध्ये एका महिलेसह दोन लहान मुलांचा समावेश आहे. मात्र 5 जणांना मृत्यू झाला आहे, त्यातील एक जण हा बचाव पथकातील जवान असल्याचे समजते. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे. अजूनही माती पडत असल्याने बचावकार्य करणाऱ्यांनाही अडथळा निर्माण होत आहे.
