गडब/सुरेश म्हात्रे
आंदोलनाची स्टंटबाजी केल्याने कंपनीकडून काहीतरी लाभ होतो व स्वार्थी आंदोलकांना कंपनीने मॅनेज केल्याने त्यांची भरभराट होते.पण हे सर्वसामान्य जनतेला अद्यापही समजत नसल्याने वर्षानुवर्षे येथील स्थानिक जनतेचा अपेक्षाभंग झालेला आहे.
डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील लि.कंपनीने वर्षानुवर्षे स्थानिक जनतेला केवळ आश्वासनेस दिलेली असून स्थानिकांची एकजूट नसल्याने आजपर्यंत या कंपनीची मनमानी सुरूच आहे त्यामुळे स्थानिक सुरक्षित बेरोजगार तरुणांची वाताहात थांबलेली नाही.कंपनी व्यवस्थापन जरी स्थानिक जनतेला नोकरीमध्ये प्राधान्य दिल्याचे ढोल वाजवीत असले तरी प्रत्यक्षात मात्र या कंपनीमध्ये परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात भरलेले आहेत आणि स्थानिक जनतेला मात्र भयानक प्रदूषणाच्या विळख्यात तडफडत ठेवलेले आहे.वर्षानुवर्षी या कंपनी विरुद्ध अनेकांनी आंदोलने केली.पण त्यानंतर ही स्थानिक सुरक्षित बेरोजगारांचा प्रश्न सुटला का? व कधी सुटणार? याचे उत्तर आजही स्थानिकांना मिळालेले नाही. कांदळवनांची कत्तल केल्याप्रकरणी अनेक वेळा शासकीय यंत्रणेने या कंपनीची कानउघडणी केली. कंपनीविरुद्ध गुन्हेही दाखल झाले. पण तरीही या कंपनीची मनमानी कोणालाही थांबविता आलेली नाही. वायू प्रदूषण, जल प्रदूषण, कांदळवनांचे संरक्षण, स्थानिकांचे प्रश्न, सामाजिक स्वास्थ्य, रोजगार, वृक्षसंवर्धन, मच्छीमारांचे प्रश्न यांसारख्या अनेक प्रश्नांची कंपनीने पूर्तता केलेली नाही. या कंपनीमध्ये बिहार,उत्तरप्रदेश, बांग्लादेश यांसारख्या अनेक परप्रांतातील काम
गार मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. ते बाहेरील राज्यातून येथे राहावयास आलेले असून त्यांतील अनेक कामगार हे गुन्हेगार असल्याचे उघडकीस येऊ लागले आहे. या परप्रांतीय कामगारांमुळे या परिसरात यापूर्वीही अनेक गुन्हे, चोऱ्या व अनुचित प्रकार घडलेले आहेत. हे परप्रांतिय कामगार दररोज अनधिकृतपणे मालवाहतुकीच्या गाड्यांमध्ये गर्दी करुन कंपनीच्या दिशेने जात असतात. या कंपनीचे व्यवस्थापन मात्र स्थानिक जनतेसाठी कार्यरत राहण्याच्या बढाया नेहमीच मारत असते. पण प्रत्यक्ष मात्र परप्रांतीय कामगारांमुळे स्थानिक बेरोजगार तरुण नोकरीपासून वंचित राहिलेले आहेत. स्वार्थी आंदोलकांच्या बेजबाबदारपणामुळे ही परिस्थिती ओढावली असून प्रकल्पग्रांची फसवणुक करणाऱ्यांना धडा शिकवावा अशी मागणी होत आहे.