गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत म्हणून गणल्या जाणाऱ्या गडब ( काराव ) ग्रामपचायतीत समस्यांचा महापुर पहावयास मिळतो . आता थोड्याच दिवसात मान्सूनला दिमाखात सुरूवात होणार असून सर्व लोक मान्सून पुर्व तयारीला लागली आहेत . गडब ग्रुप ग्रा पं . तीत मुख्य नाल्याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साठलेले आढळतात ग्रा.पं तीने ठीक - ठिकाणी कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत . मात्र काही ग्रामस्थ त्या कचरा कुंडीत कचरा न टाकता तो कचरा नात्यात तसाच फेकून देऊन एक प्रकारे नाल्यालाच कचरा कुंडी बनवीली आहे .
यामुळे गावात पुर सहश्य स्थीती पहायला मिळते . गावात पुराचे पाणी जाऊन आतोनात नुकसान होत असते . याला जबाबदार असले \ संबंधीत खात्याचे अधिकारी हात वर करायला मोकळे होतात . गेल्या वर्षी पुराच्या पाण्याची पातळी ओलांडून अनेक लोकांचे नुकसान झाले होत . त्या काही ग्रामस्थांना अजुनही नुकसान भरपाई भेटलेली नाही . मग त्यांनी जायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे . सध्या स्थितीत पुरुषोत्तम झेले यांच्या बाजुला नाल्यात मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या व पाळा- पाचोळा टाकल्याने मोठ्या प्रमाणा मार्ग बंद झाला आहे त्यामुळे पाणी पिचिंग च्या वरून गावात जाण्याचा धोका संभवत आहे . तरी सरपंच या नात्याने मान्सून पुर्व नाले सफाई होणे क्रमप्राप्त आहे .
.